एका अश्लील MMS ने उद्ध्वस्त केलं या अभिनेत्रीचं करिअर, सोडावं लागलं बॉलिवूड

 एका एमएमएसने अभिनेत्रीच्या फिल्मी करिअरला ग्रहण लावलं

Updated: Jan 24, 2022, 01:26 PM IST
एका अश्लील MMS ने उद्ध्वस्त केलं या अभिनेत्रीचं करिअर, सोडावं लागलं बॉलिवूड title=

मुंबई : रिया सेन ही एक अशी बॉलिवूड अभिनेत्री होत. जिच्याबद्दल असं म्हटलं जात होतं की, ती भविष्यात खूप नाव कमवेल. ती दिसण्यात जितकी सुंदर होती तितकीच ती अभिनयातही कणखर होती. पण एका एमएमएसने तिच्या फिल्मी करिअरला ग्रहण लावलं. आज 24 जानेवारीला रिया सेनचा वाढदिवस आहे आणि आज ती 41 वर्षांची झाली आहे.

रियाने दिले बरेच हिट सिनेमा 
रिया सेन ही या बॉलीवूड अभिनेत्रींपैकी एक आहे. जिच्या कारकिर्दीला वादांच्या भोवऱ्याने असं ग्रहण लागलं होतं की, हे ग्रहण कधीच संपलं नाही. रिया सेन ही हिंदी आणि बंगाली चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री मुनमुन सेन यांची मुलगी आहे. रिया सेनच्या हिट चित्रपटांमध्ये फक्त 'स्टाईल', 'झंकार बीट्स' आणि 'अपना सपना मनी-मनी' हेच चित्रपट लक्षात राहतात. पण तिच्याशी निगडित वाद अधिक लोकांना आठवतात. एक वाद ज्याने तिचं जग उलटं केलं. एक असा वाद ज्याने तिला यशाच्या चकाकीतून बदनामीच्या अंधारात आणलं.

हॉट सीन्समुळे होती चर्चेत
रिया सेनने 1991 मध्ये बालकलाकार म्हणून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. ती अभिनेत्री रायमा सेनची धाकटी बहीण देखील आहे. रिया सेन त्रिपुराच्या राजघराण्यातील आहे. तिचे वडील भरत देव वर्मा हे कूचबिहारच्या राणी इला देवी यांचे पुत्र आहेत. रियाला पहिली ओळख फाल्गुनी पाठकच्या 'चुडी जो खानकी हाथो में' या गाण्यातून मिळाली. स्टार किड होऊनही रिया यशस्वी अभिनेत्री म्हणून स्वत:ला स्थापित करू शकली नाही. रिया तिच्या चित्रपटांमधील बोल्ड आणि हॉट सीन्समुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र, आता रिया पूर्णपणे बंगाली चित्रपटांकडे वळली आहे.

लाइमलाईटमध्ये होते अफेअर
रिया सेन नेहमीच तिच्या अफेअरमुळे चर्चेत असते. तिच्या बॉयफ्रेंडमध्ये अक्षय खन्ना ते लेखक सलमान रश्दी यांच्या नावांचा समावेश आहे. तर रश्दीचे वय रियापेक्षा दुप्पट होतं. दोघांनी ही गोष्ट कधीच मान्य केली नाही. पण काही काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघंही वेगळे झाले. 2011 मध्ये रिया अनेकवेळा स्टेडियममध्ये श्रीशंतला चिअर करताना दिसली होती. रिया सेनने 2017 मध्ये तिचा बॉयफ्रेंड शिवम तिवारीसोबत एका खाजगी समारंभात लग्न केलं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रियाचा एमएमएस लीक
रियाच्या आयुष्यातील सर्वात मोठा वाद म्हणजे तिचा अभिनेता अश्मित पटेलसोबतचा एमएमएस लीक झाला. या व्हिडिओमध्ये ते एकमेकांना किस करताना दिसत होती. 2005 मध्ये रिया आणि अश्मित रिलेशनशिपमध्ये होते. या दरम्यान रियाचा एक चित्रपट प्रदर्शित होणार होता. प्रसिद्धीसाठी रियानेच हा व्हिडिओ लीक केल्याचा आरोप लोकांनी केला होता. मात्र दोघांनीही हा व्हिडिओ फेक असल्याचं म्हटलं होतं. या वादामुळे सगळं काही बदललं आणि रियाला बॉलिवूड इंडस्ट्री सोडावी लागली.