मुंबई : भारताने कसोटीसोबत वन डे सीरिजही गमावली आहे. असं असताना फक्त क्रिकेट प्रेमिंनी नाही तर प्रत्येकाला एक गोड बातमी मिळाली आहे. या सामन्या दरम्यान अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीची मुलगी वामिका सर्वांसमोर आली. त्यामुळे सध्या सर्वत्र विरूष्काच्या लेकीची चर्चा आहे. लाईव्ह मॅचचं प्रक्षेपण सुरू असताना त्याचवेळी कॅमेऱ्यामनची नजर अनुष्कावर गेली.
अनुष्काच्या कडेवर लहान मुलगी दिसत आहे. ती वामिका असल्याचं सांगितलं जात आहे. सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होत आहेत. मुलीचा पहिला फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असल्याचं कळताचं अनुष्काने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत अनुष्का म्हणाली, 'आमच्या मुलीचा फोटो काल स्टेडियमवर क्लिक करण्यात आला आणि तो आता व्हायरल होत आहे. आम्हाला माहिती नव्हतं कॅमेऱ्याची नजर आमच्यावर आहे.'
पुढे अनुष्का म्हणाली, 'मुलीच्या फोटोंवर आमची भूमिका पूर्वीसारखीच आहे. आम्ही अपेक्षा करतो की तुम्ही वामिकाचे फोटो क्लिक किंवा प्रिंट करू नये. या मागचे कारण आम्ही तुम्हाला आधीच सांगितले आहे.' असं देखील अनुष्का म्हणाली.