Vivek Agnihotri नव्या वादात; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

'द काश्मीर फाइल्स'चा दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री सध्या सतत वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे.

Updated: Mar 26, 2022, 07:44 PM IST
Vivek Agnihotri नव्या वादात; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय? title=

मुंबई : 'द काश्मीर फाइल्स'चा दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री सध्या सतत वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. 200 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या या चित्रपटाने कौतुका प्रमाणेच विरोधाचाही सामना केला. आहे. त्याचबरोबर, चित्रपट दिग्दर्शक त्याच्या एका वादग्रस्त विधानामुळे कायदेशीर अडचणीत सापडला आहे. या तक्रारीवरून एफआयआर नोंदवण्याची मागणीही करण्यात आली आहे.

म्हणाला,  'भोपाली समलिंगी आहे'
'द काश्मीर फाईल्स'च्या दिग्दर्शकाने 'भोपाली म्हणजे समलिंगी'  नुकत्याच केलेल्या या वक्तव्याविरोधात मुंबईत पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. आणि त्याच्याविरुद्ध मानहानी आणि इतर कलमांखाली एफआयआर नोंदवण्याची विनंती करण्यात आली होती. एका पोलीस अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितलं की, विवेक अग्निहोत्री विरुद्ध पत्रकार आणि सेलिब्रिटी पीआर व्यवस्थापक रोहित पांडे यांनी त्यांचे वकील अली काशिफ खान देशमुख यांच्यामार्फत वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

'भोपाळच्या लोकांचा केलाअपमान?
अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या तक्रारीत असं म्हटलं आहे की, 'द काश्मीर फाइल्स'च्या दिग्दर्शकांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत 'जाणूनबुजून, निर्दयीपणे भोपाळच्या लोकांना समलैंगिक म्हटलं आहे.त्यांनी भोपाळचा अपमान केला आहे. या संदर्भात लेखी तक्रार प्राप्त झाल्याची पुष्टी अधिकाऱ्याने केली.

ते म्हणाले की, अग्निहोत्री विरुद्धच्या तक्रारीत भारतीय दंड संहितेच्या कलम 153A आणि B, कलम 295Aनोंदवण्याची विनंती केली. कलम 298  आणि कलम-505 II अंतर्गत खटला दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, शुक्रवारी भोपाळमध्ये आयोजित चित्रपट महोत्सवात जाण्यापूर्वी अग्निहोत्रीच्या मुलाखतीचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ तीन आठवडे जुना असल्याचं सांगण्यात येत आहे.