Viral Video: रवीनाचा Quick Style ग्रुपसोबत 'टिप टिप बरसा पाणी' गाण्यावर भन्नाट डान्स; 90 च्या दशकातील आठवणी जाग्या

Viral Video: नॉर्वेमधील (Norwegian dance crew) डान्स ग्रुप Quick Style सध्या भारतात असून वेगवेगळ्या सेलिब्रिटींसह डान्स करत रिल (Reel) बनवत आहेत. त्यांचे व्हिडीओ (Video) तुफान व्हायरल (Viral) होत असून नुकताच त्यांनी बॉलिवूडची बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री रवीना टंडनसह (Raveena Tondon) 'टिप टिप बरसा पाणी' (Tip Tip Barsa Pani) गाण्यावर डान्स केला. रवीना टंडनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.   

Updated: Mar 18, 2023, 02:41 PM IST
Viral Video: रवीनाचा Quick Style ग्रुपसोबत 'टिप टिप बरसा पाणी' गाण्यावर भन्नाट डान्स; 90 च्या दशकातील आठवणी जाग्या title=

Raveena Tondon Viral Video: 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींचं नाव जेव्हा घेतलं जातं तेव्हा त्यामध्ये रवीना टंडनचं (Raveena Tondon) नाव प्राधान्याने घेतलं जातं. आपला अभिनय आणि नृत्याने तिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. रवीनाचं 'टिप टिप बरसा पाणी' (Tip Tip Barsa Pani) हे आजही तितकंच प्रसिद्ध असून अनेक कार्यक्रमांमध्ये हे गाणं वाजवलं जातं. दरम्यान, नुकतंच रवीनाने पुन्हा एकदा या गाण्यावर भन्नाट डान्स करत चाहत्यांच्या जुन्या आठवणी ताज्या केल्या आहेत. यावेळी तिच्या जोडीला सोशल मीडियावरील प्रसिद्ध नॉर्वेमधील (Norwegian dance crew) Quick Style हा ग्रुप होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

Quick Style हा डान्स ग्रुप सध्या भारतात आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसह हा ग्रुप डान्स करत असून त्याचे रिल तयार करत इन्स्टाग्रामला शेअर करत आहेत. नुकतंच त्यांनी रवीना टंडनसह 'टिप टिप बरसा पाणी' गाण्यावर डान्स केला आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामला शेअर करताना “Different when you do it with the originals” अशी कॅप्शन Quick Style ने दिली आहे. 

व्हिडीओत रवीना टंडन काळ्या क्रॉप टॉप आणि जीन्समध्ये दिसत आहे. पाहा व्हिडीओ - 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Quick Style (@thequickstyle)

रवीना टंडनचं हे गाणं 90 च्या दशकात रिलीज झालेल्या 'मोहरा' चित्रपटातील आहे. या चित्रपटात रवीनासह सुनील शेट्टी आणि अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. यासोबतच चित्रपटातील गाणीही हिट झाली होती. ना कजरे की धार, तू चीज बडी है मस्त आणि टिप टिप बरसा पाणी ही गाणी आजही प्रेक्षक तितक्याच आवडीने पाहतात. 

2021 मध्ये रिलीज झालेल्या 'सूर्यवंशी' चित्रपटात हे गाणं वापरण्यात आलं. यावेळी या गाण्यात अक्षय कुमारसोबत रवीनाच्या जागी कतरिना होती. 

दरम्यान Quick Style ने रवीनाच्या आधी सुनील शेट्टीसोबतही डान्स केला आहे. 'आँखो मे बसे हो तुम' गाण्यावर सुनील शेट्टीसोबत त्यांनी डान्स केलेल्या व्हिडीओचीह चर्चा आहे. “Felt like we have known him (Suniel Shetty) for years” अशी कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिली होती. 1995 मध्ये आलेल्या 'टक्कर' चित्रपटातील हे गाणं आहे. यामध्ये सुनील शेट्टीसोबत सोनाली बेंद्रे होती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Quick Style (@thequickstyle)

तसंच Quick Style ने भारतीय क्रिकेट विराट कोहली आणि अनिल कपूर यांच्यासोबही डान्स केला असून त्यांचीही चांगलीच चर्चा आहे. तसंच मुंबईच्या लोकलमध्ये त्यांनी केलेल्या डान्सचा व्हिडीओ तर तुफान व्हायरल झाला आहे.