'हा बॉलिवूड सेलिब्रिटींपेक्षा चांगला', अनंत अंबानींनी ताफा थांबवून तरुणासाठी जे केलं ते पाहून नेटकरी भारावले

अनंत अंबानी (Anant Ambani) यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत एक तरुण अनंत अंबानी यांना ताफा जात असताना एका फोटोसाठी विनंती करताना दिसत आहे. यानंतर अनंत अंबानी यांनी जे केलं ते पाहून नेटकरी कौतुक करत आहेत.   

शिवराज यादव | Updated: Jul 13, 2024, 09:09 PM IST
'हा बॉलिवूड सेलिब्रिटींपेक्षा चांगला', अनंत अंबानींनी ताफा थांबवून तरुणासाठी जे केलं ते पाहून नेटकरी भारावले title=

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) फक्त भारतच नाही तर आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक आहेत. सध्या अंबानी कुटुंब कौटुंबिक सोहळ्यामुळे चर्चेत आहे. मुकेश अंबानी आणि निता अंबानी (Nita Ambani) यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhik Merchant) विवाहबंधनात अडकले आहेत. या लग्नाला फक्त भारतच नाही तर जगभरातील उद्योजक, राजकारणी, सेलिब्रिटी हजर आहेत. या लग्नातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) होत आहेत. यादरम्यान अंबानी कुटुंबाचा साधेपणा दाखवणारा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनंत अंबानी यांचं कौतुक होत आहे. 

व्हिडीओत अनंत अंबानी रस्त्याच्या कडेला उभ्या एका तरुणासाठी आपला ताफा थांबवल्याचं दिसत आहे. हा तरुण त्यांना एका फोटोसाठी विनंती करत होता. महिन्याच्या सुरुवातीला व्हायरल झालेल्या या व्हिडीओत अनंत अंबानी तरुणासह फोटो काढण्यासाठी कार थांबवण्यास सांगताना दिसत आहे. 

व्हिजडीओच्या सुरुवातीला एक तरुण रस्त्याशेजारी अंबानींचा ताफा पाहत थांबलेला उभा असल्याचं दिसत आहे. अनंत अंबानी आपल्या रोल्स रॉयल्समधून येताना दिसत आहेत. यावेळी तरुण त्यांना हातवारे करत आपल्याला एक फोटो काढायचा आहे अशी विनंती करतो. यानंतर तरुणाला अपेक्षाही नसेल ते घडतं. 

अनंत अंबानी आपल्या चालकाला कार थांबवायला सांगतात. यानंतर ते तरुणाला कारजवळ बोलावतात आणि त्याच्यासह फोटो काढतात. यावेळी त्याच्यासोबत हस्तांदोलनही करतात. यादरम्यान तरुणाच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद दिसत आहे. 

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनंतत अंबानी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. एका इंस्टाग्राम युजरने अनंत अंबानी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींपेंक्षा चांगला आहे असं कौतुक केलं आहे. तर एकाने हा फारच जमिनीशी जोडलेला आहे असं विधान केलं आहे. तर एकाने म्हणून यांचं सेलिब्रेशन उगाच अती वाटत नाही असं सांगितलं आहे. 

तर एका युजरने अनंत अंबानी यांच्या चालकाचं कौतुक केलं आहे. त्यानेही फोटो चांगला यावा यासाठी लाईट सुरु केला असं त्याने निदर्शनास आणून दिलं आहे. अनंत अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांचे धाकटे पुत्र आहेत. 12 जुलै रोजी मुंबईच्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये एका भव्य समारंभात त्यांचा राधिका मर्चंटशी विवाह झाला.