Amitabh Bachchan Shared Post After Ambani Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट काल 12 जुलै रोजी लग्न बंधनात अडकले. यावेळी संपूर्ण बॉलिवूड त्यांच्या लग्न सोहळ्यात पोहोचलं होतं. मात्र, सगळ्यांना आश्चर्य तेव्हा झालं जेव्हा बच्चन कुटुंबानं आणि ऐश्वर्या, आराध्यानं वेगळी एन्ट्री घेतली. त्यांनी एकत्र पोज देखील दिल्या नाहीत. अमिताभ हे पत्नी जया बच्चन, मुलगा अभिषेक बच्चन, लेक श्वेता बच्चन आणि नात आणि नातू आणि जावयासोबत पोहोचले होते. तर त्यांनी पापाराझींना पोज दिल्या. पण त्यावेळी ऐश्वर्या आणि आराध्या दिसल्या नाही. संपूर्ण कुटुंबासोबत घरी परतल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी मध्य रात्री एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये अमिताभ बच्चन यांनी छोट्या छोट्या गोष्टी किती महत्त्वाच्या ठरतात आणि त्या गोष्टींविषयी सांगितलं ज्या हळू-हळू दुरावतात.
ज्या प्रकारे संपूर्ण बच्चन कुटुंब आणि ऐश्वर्या राय एकमेकांकडे दुर्लक्ष करताना दिसले आणि त्याशिवाय एकमेकांसोबत पोज देखील दिल्या. त्यामुळे पुन्हा एकदा ते विभक्त होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
या सगळ्यात अमिताभ बच्चन यांनी लग्नातून परतल्यानंतर एक ब्लॉग शेअर केला. अमिताभ म्हणाले, 'या वेळी मी देखील काही लोकांना एकमेकांशी जोडून राहण्याची इच्छा असणं महत्त्वाचं असतं. दुसरीकडे काही लोकांसाठी हा वेळ कामावर जाण्याचा आहे, तर माझ्यासाठी माझ्या EF म्हणजेच एक्सटेंडेड फॅमिलीला भेटण्यासाठी आहे. एका शाही लग्न सोहळ्यातून परतलोय पण जुने मित्र आणि जवळच्या लोकांना भेटल्यानंतर फक्त प्रेम आणि आपुलकीचा खजिन्याविषयी विचार करतोय. इतकं प्रेम आणि आपुलकी मिळाली. त्या सगळ्यांचे चेहरे देखील बदलले आहेत. पण त्यांच्यासोबत घालवलेला वेळ आमच्या काळातील प्रेम आणि एकमेकांची आपुलकीची आठवण झाली, त्यात अजून काही कमी झालेली नाही.'
हेही वाचा : 'भारतीय जेवण हे घाणेरडं'; अंबानींच्या लग्नासाठी भारतात आलेल्या किम कर्दाशियनचा 'तो' VIDEO VIRAL
पुढे अमिताभ म्हणाले, 'हेच तर आयुष्य आहे... प्रेम, नातं आणि आपुलकी अजूनही आहे. पण हे थोडं विचित्र आहे की कशा प्रकारे छोट्या-छोट्या गोष्टी आहेत ज्या एकमेकांसाठी महत्त्वाच्या ठरतात आणि त्यामुळे नातं हे टिकून राहतं. ज्यांच्यासोबत खूप जवळचं नात असतं किंवा त्यांच्यासोबत चांगला वेळ व्यथित केलेला असतो, ते आपल्यासोबत राहतात, पण ते हरवतात आणि विसरतात. खरंच विसरलेले नाहीत, पण कुठेतरी मागे राहिले आहेत. जेव्हा त्या सहवासाला किंवा नातेसंबंधाला अर्थ असतो तेव्हाच ते लक्षात ठेवले जातात किंवा त्यांचा उल्लेख केला जातो. तेव्हाच त्यांची आठवण होते येते जेव्हा असोसिएशन अर्थ असतो.'