SHOCKING NEWS ABOUT REKHA: रेखाला आजही बॉलीवूडमध्ये एव्हरग्रिन अभिनेत्री म्हणून ओळखलं जात वयाच्या 63व्या वर्षीसुद्धा रेखा आजही तितकीच सुंदर फिट आणि चिरतरुण दिसते.
तीचं आरस्पानी सौन्दर्य पाहून आजही भलेभले चकित होतात. एक काळ होता जेव्हा रेखाने आपल्या अभिनयाने,आपल्या डान्सने आणि अदांनी प्रेक्षकांना घायाळ केलं होत.आजही अनेकजण आहेत जे रेखाला पसंद करतात नवोदित कलाकार मुख्यतः अभिनेत्रींसाठी रेखा इन्स्पीरेशन आहे .
साध्या राहणीमानापासून ते बॉलिवूडची सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री हा रेखाचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. रेखा तामिळ अभिनेता जेमिनी गणेशन आणि तेलगू अभिनेत्री पुष्पावल्ली यांची मुलगी आहे. रेखाचे बालपण म्हणजे एक मोठा संघर्ष होता.
सुरवातीला रेखाला कोणीही चित्रपट देत न्हवते तिला चित्रपट मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला होता सुरवातीला तर रेखाला कुरूप म्हटलं जायचं त्या रंगाने सावळ्या होत्या त्याची मस्करी केली जायची पण रेखाने स्वतःला पूर्णपणे बदललं.
1976 मध्ये रेखाने स्वतःच मेकओव्हर केला आणि सर्वांना तिची दखल घ्यायला भाग पडलं आणि त्यांनतर रेखा ही केवळ तिच्या सौन्दर्यासाठी खूप प्रसिद्ध झाली.आज रेखा वर्षानुवर्षे चित्रपटांपासून दूर आहे, म्हणून कदाचित तुमच्या मनात असा प्रश्न पडला असेल की रेखा तिचा घरखर्च कसा सांभाळत असेल. चला तर मग बघुयात रेखा घरखर्च सांभाळण्यासाठी अस करतेय तरी काय ?
रेखा जर बर्याच वर्षांपासून चित्रपटांपासून खरोखर दूर आहे असं नाही रेखा एका वर्षात कमीतकमी एका तरी चित्रपटात दिसत असते. रेखाचे लवकरच 2 चित्रपट येणार आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त, रेखा मुंबई आणि दक्षिण भारतात घरे भाड्याने देऊन त्यापासून मिळणारे भाडे देखील तिची कमाई आहे.
आपल्या सर्वांना माहित आहे की रेखा राज्यसभेच्या सदस्य आहेत. राज्यसभेच्या सदस्याप्रमाणे रेखा यांना पगार देखील मिळतो. तसेच रेखा काही टीव्ही शोमध्ये देखील दिसते. रेखा यांना शोमध्ये हजेरी लावण्यासाठी देखील पैसे दिले जातात.