Viral Meme Dog: इंटरनेटवर सर्वात जास्त व्हायरल झालेल्या 'चिम्स'चे निधन

Viral Meme Dog Cheems: सोशल मीडियावर सगळ्यात व्हायरल झालेला चिम्स आपल्या सर्वांना सोडून गेला आहे. त्यामुळे सोशल मीडियावरून शोक व्यक्त करण्यात आला आहे. तुम्ही त्याचे पहिलेले सर्वात आवडते मीम कोणते होते? 

गायत्री हसबनीस | Updated: Aug 20, 2023, 12:44 PM IST
Viral Meme Dog: इंटरनेटवर सर्वात जास्त व्हायरल झालेल्या 'चिम्स'चे निधन  title=
August 20, 2023 | viral meme dog cheems dies during a surgery

Viral Meme Dog Cheems: सोशल मीडियावर व्हायरल मीम्समुळे आपला दिवस अगदी आनंदी जातो. या मीम्सची कल्पना फार भारी आहेच. परंतु या मीममधये दिसणारे कलाकार, व्यक्ती, प्राणी आणि वस्तूही सेलिब्रेटी झाले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांना अगदी नावानुसार ओळखले जाते. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते. मध्यंतरी असे इतके मीम्स व्हायरल झाले होते की काही विचारू नका. तुम्हाला या मीम्समध्ये व्हायरल झालेला एक शिबा इनू जातीचा कुत्रा आठवतोय का? हा कुत्रा व्हायरल मीन्स डॉग म्हणून इंटरनेटवर सगळ्यात जास्त व्हायरल झाला होता. त्यांचे मीम्स हे सोशल मीडियावर चांगलेच व्हारल व्हायचे त्यामुळे त्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली असायची. समोर आलेल्या माहितीनुसार या कुत्र्याचे निधन झाले असून इंटरनेटवर सगळ्यांनी त्याला श्रद्धाजंली वाहिली आहे. आपला आवडता पेट, त्याचे निधन व्हावे; अगदी कुणीतरी आपल्या घरातलाच आपल्याला सोडून जावा अशाप्रकारे अनेक सोशल मीडिया धारक शोक व्यक्त करताना दिसत आहेत. 

व्हायरल होणाऱ्या मीम्समध्ये त्याला चीम्स, बालट्झ किंवा बॉल बॉल असंही म्हटलं जायचे. त्याचसोबतच त्याला चीम्सबर्गर असंही नावं होतं. चीम्सच्या मृत्यूची बातमी त्याचा मालकानं इन्टाग्रामवरून दिली आहे. यावेळी त्यानं एक इन्टाग्रामवर पोस्ट केली आहे. ज्यात तो म्हणतो की, ''तुम्ही दु:खी होऊ नका, मीम्सचा भाग बनून बालट्झ आपल्याला सोडून गेला आहे. तुम्हाला आणि मला मीम्समधून हसवणारा शिबा इनू आपल्याला सोडून गेला असून त्यानं लॉकडाऊनच्या काळात त्यानं खूप हसवलं आणि अनेकांना जीवनदान दिलं आहे. तुम्हाला त्यानं भरपूर प्रमाणात हसवलं आहे. त्याचे हेच ध्येय आता साध्य झाले आहे.''

हेही वाचा : हेमा मालिनी यांनी पाहिला गदर 2; सनी देओल आधी 'या' गोष्टींचे केलं कौतुक

यावेळी त्याच्या निधनानं सगळ्यांनाच दु:ख झाले आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली आहे. 2010 साली चीम्सचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या फोटोनंतर तो सगळीकडेच फेमस झाला होता. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. त्यानंतर त्याचा हा फोटो मीम्समध्ये वापरायला सुरूवात केली होती. त्यानंतर त्याचे हे फोटो इतके फेमस झाले की तो जगात फेमस झाला होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोशल मीडियावर मीम्समधून असे अनेक प्राणी व्हायरल झाले होते त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती.