ज्येष्ठ अभिनेत्री विजयता पंडित (Vijayta Pandit) यांनी राजेंद्र कुमार यांनी आपलं करिअर उद्ध्वस्त केल्याचा आरोप केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. विजयता पंडित यांनी 1981 मध्ये कुमार गौरवसोबत लव्ह स्टोरी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यादरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. पण प्रेमात पडणं विजयता पंडित यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत विजयता पंडित यांनी कुमार गौरवच्या कुटुंबाचा त्यांच्या नात्याला विरोध का होता? याचा खुलासा केला. विजयता पंडित यांनी नंतर आदेश श्रीवास्तवसह लग्न केलं. कुमार गौरव फार पझेसिव्ह होता आणि मत्सरातून त्याने एकदा स्वत:ला जखमी केलं होतं असाही गौप्यस्फोट केला.
"मला काम करायचं होतं. मला अनेक चित्रपटांच्या ऑफर येत होत्या. पण मी लग्न करण्याचा विचार करत होते. बंटी (कुमार गौरव) मला नेहमी तुला काम का करायचं आहे अशी विचारणा करत असे. तो म्हणायचा, तू माझ्या घऱाची आणि माझी हिरोईन हो. तू काम करण्याची गरज नाही. आपण लग्न करु आणि मी काम करत जाईन असं तो म्हणायचा. त्याचे वडील मला चित्रपटांमधून काढून टाकत असल्याचं त्याला माहिती होतं," असं विजयता पंडित यांनी सांगितलं.
80 च्या दशकात, सह-कलाकारांच्या प्रेमात पडणं हे सामान्य नव्हतं असं विचारण्यात आलं असत्या त्या म्हणाल्या. ही एक सामान्य प्रथा आहेय विशेषत: ज्यांनी रोमँटिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. कलाकार त्याकाळात आपल्या करिअरच्या भितीपोटी त्यांचेंअफेअर लपवत असत. प्रेम कथांमध्ये काम करणारे सर्व कलाकार प्रेमात पडतात असं त्या म्हणाल्या.
कुमार गौरवसोबतचा चित्रपट कल्ट हिट झाला असला तरी त्यांची प्रेमकथा मात्र सपशेल अपयशी ठरली. त्यावर बोलताना त्यांनी सांगितलं की, "मला वाटत नाही त्याला काही त्रास झाला. आम्ही दोघं प्रेमात होतो आणि त्याच्या कुटुंबाचा विरोध होता. त्यांना बंटीचं माझ्यावरील लक्ष हटवायचं होतं. त्यांची एक बहीण नम्रता दत्तसोबत (संजय दत्तची बहिण) अभ्यास करत असे. ती नम्रताला घऱी आणायची आणि मग ते त्या दोघांना एकमेकांना जवळ आणण्यासाठी प्रयत्न करत असते. त्यांनी न्रमता विजयतापेक्षा बरी आहे असं वाटायचं. कुटुंबाने इतका दबाव टाकला की अखेर नम्रता आणि बंटी एकत्र आले. त्यांनी वाटलं की, ती सुनील दत्त यांची मुलगी आणि श्रीमंत असल्याने चांगला पर्याय आहे".
"बंटी माझ्याप्रती विश्वासू होती. त्याने माझ्यावर फार प्रेम केलं. तो मला सोडेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. एकदा मी माझ्या घराजवळच्या शॅकमध्ये वाढदिवसाची पार्टी ठेवली होती. तिथे बंटीही आला होता. मी तिथे शाळेतील मित्राशी बोलत आणि डान्स करत होते. त्यावेळी बंटीने तेथील ग्लासवर हात आपटून जखमी करुन घेतला होता. माझे भाऊ घाबरले होते. तो म्हणाला, मी काय पाहू शकत नाही का? तू त्याच्यासोबत डान्स का करत होतीस? अशा घटनांमुळे त्याचं माझ्यावर फार प्रेम आहे यावर विश्वास बसला. आम्ही लग्न करणार असल्याने माझं कुटुंब आनंदी होतं. तो घऱीदेखील यायचा," असं विजयता पंडित यांनी सांगितलं,
पैसा आणि आर्थिक दर्जामुळे आमच्यात अंतर आलं असं सांगताना त्या म्हणाल्या की, "त्याच्या कुटुंबाला आम्ही त्यांच्याइतके श्रीमंत नाही असं वाटलं. पैशांमुळेच त्यांचा आमच्या नात्याला विरोध होता. त्यांना एका श्रीमंत घऱातील मुलीशी लग्न लावायचं होतं. राजेंद्र कुमार पैशांचा विचार कऱणारे होते. त्यांना मुलाने श्रीमंत मुलीशी लग्न करावं असं वाटत होतं. आम्ही श्रीमंत नसलो तरी स्थिती चांगली होती".