विजय देवरकोंडा-अनन्या पांडेचा रोमँन्टिक अंदाज; हरवले एकमेकांच्या मिठीत

साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या त्यांच्या मोस्ट अवेटेड चित्रपट 'लिगर'मुळे चर्चेत आहेत. 

Updated: Aug 7, 2022, 11:40 PM IST
विजय देवरकोंडा-अनन्या पांडेचा रोमँन्टिक अंदाज; हरवले एकमेकांच्या मिठीत title=

मुंबई : साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या त्यांच्या मोस्ट अवेटेड चित्रपट 'लिगर'मुळे चर्चेत आहेत. या दोघांच्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. विजय आणि अनन्या सध्या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. करण जोहर निर्मित, लिगर 25 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

विजय-अनन्याने पुन्हा केलं सिझलिंग फोटोशूट
दरम्यान, अनन्या पांडेने तिच्या 'लिगर' चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये विजय देवरकोंडासोबत तिची धमाकेदार केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. फोटोंमध्ये अनन्या पिंक कलरचा ब्रॅलेट टॉप आणि पँट घातलेली दिसत आहे. तर दुसरीकडे, विजय देखील लाल फ्लोरल प्रिंटच्या शर्टमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दोघांची केमिस्ट्री मस्त दिसत आहे
अनन्याने लूक पूर्ण करण्यासाठी हलका मेकअप केला आहे. आणि तिचे केस मोकळे सोडले आहेत. याचबरोबर तिने हूप इअररिंग्ज पेअर केल्या आहेत. या फोटोंमध्ये दोघांची केमिस्ट्री जबरदस्त दिसत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की विजय आणि अनन्याचे हे फोटो त्यांच्या 'लाइगर' चित्रपटाच्या सेटवरील आहेत.