#Video : अन 'या' मुलीचा डान्स पाहून सलमान खानही झाला 'दीवाना'

अभिनेता सलमान खान हा बॉलिवूडचा दबंगस्टार आहे. 

Updated: Jun 4, 2018, 12:59 PM IST
#Video :  अन 'या' मुलीचा डान्स पाहून सलमान खानही झाला 'दीवाना'  title=

मुंबई : अभिनेता सलमान खान हा बॉलिवूडचा दबंगस्टार आहे. 'भाईजान'च्या चित्रपटामध्ये त्याचे अ‍ॅक्शन सिक्वेन्स, पिळदार शरीर पाहण्यासाठी जितकी चाहत्यांची उत्सुकता असते तितकेच त्याचे डान्स पाहण्यातही खास मज्जा असते. साचेबंद कोरिओग्राफीपेक्षा खास सलमान स्टाईलमधल्या स्टेप्स लोकांना अधिक आवडतात. सलमान खानचं नृत्य कलेवरचं खास प्रेम नुकतच एका रिएलिटी शोमध्ये दिसून आलं. 

डान्स दीवानेमध्ये सलमान खान  

अभिनेता सलमान खान 'रेस 3' च्या प्रमोशनसाठी डान्स दीवाने या रिएलिटी शोमध्ये आला होता. त्यावेळेस सलमान खानसोबत जॅकलीन फर्नांडीस, अनिल कपूरदेखील आले होते. 

व्हिडिओ होतोय व्हायरल  

सलमान खानला एका स्पर्धकाचा डान्स आवडला. तिच्या अदा पाहून सलमान खानही उठून तिच्या सटेप्स फॉलो करायला लागला. या डान्सची खास व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये झपाट्याने व्हायरल होत आहे. सलमान खानसोबतच जॅकलीन आणि इतर परिक्षकांनीही तिचं कौतुक केले आहे. 

 

15 जूनला  'रेस 3' येणार   

रेस 3 हा सिनेमा 15 जूनला रीलिज होणार आहे. या चित्रपटामध्ये सलमान खान, जॅकलीन फर्नांडीस, डेजी शहा, अनिल कपूर अशी तगडी स्टारकास्ट आहे. रेमो डिसुझाने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 'रेस 3' नंतर सलमान खान 'भारत' चित्रपटामध्ये झळकणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरूवात होणार आहे.