#MeToo प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले असरानी

काय म्हणाले असरानी 

#MeToo प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले असरानी  title=

मुंबई : #MeToo हे वादळ दिवसेंदिवस वाढत आहे. तनुश्री दत्ता - नाना पाटेकर प्रकरणापासून सुरू झालेली ही चळवळ आता जोर धरत आहे. आता नाना पाटेकरांसह 4 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. हॉलिवूडमधील हे लोण आता बॉलिवूडमध्ये देखील पसरताना दिसत आहे. लैंगिक अत्याचाराचा मुद्दा घेऊन आज अनेक महिला कलाकार किंवा सिनेसृष्टीतील इतर मंडळी समोर येऊन आपल्या व्यथा मांडत आहेत. पण अजूनही या प्रश्नाकडे गांभीर्याने बघावं की हा पब्लिसिटी स्टंड आहे यामध्ये मात्र अनेकजण अडकल्याचे दिसत आहे. 

असं असताना आता ज्येष्ठ अभिनेता असरानी यांनी #MeToo प्रकरणावर आपलं मत व्यक्त केलं आहे. असरानी म्हणतात की, मी महिलांना सपोर्ट करतो आणि तो प्रत्येकानेच करायला हवा. पण हे सगळं पब्लिसिटीसाठी असल्याचं मला वाटतं. सिनेमांच्या प्रमोशनसाठी हा सारा खटाटोप करण्यात आला आहे बाकी काही नाही. त्यामुळे कोणतीही गोष्ट गांभीर्याने घेऊन नका. 

त्याचप्रमाणे आज मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमीर खानने देखील मोठा निर्णय घेतला आहे. आमिरने ट्विटरवरून या निर्णयाची माहिती सर्वांना दिली. त्यानुसार आमिर खान भविष्यात लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीबरोबर चित्रपट करणार नाही. आमिरने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, लैंगिक गैरवर्तन आणि कोणत्याही प्रकारचे शोषण खपवून न घेण्याचे धोरण आमिर खान प्रॉडक्शन हाऊसने नेहमीच अवलंबिले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून #MeToo या मोहीमेमुळे लैंगिक शोषणाच्या अनेक धक्कादायक कहाण्या समोर येत आहेत. त्यावेळी आम्हीदेखील लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या काही लोकांसोबत काम करत असल्याचे आमच्या निदर्शनास आले. अधिक चौकशी केली असता संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे समजले. त्यामुळे आम्ही संबंधित व्यक्तीसोबत काम न करण्याच निर्णय घेतल्याचे आमिरने सांगितले.