उर्फीचा कहर!!! एका दोऱ्याचा 'हा' ड्रेस घालून केला डान्स; व्हीडिओ व्हायरल

तिचे बोल्ड आणि सुंदर फोटो आणि व्हिडिओ दररोज सोशल मीडियावर व्हायरल होतात. 

Updated: Jul 16, 2022, 09:13 PM IST
उर्फीचा कहर!!! एका दोऱ्याचा 'हा' ड्रेस घालून केला डान्स; व्हीडिओ व्हायरल title=

Urfi Javed: सध्या सर्वात जास्त ट्रेडिंग असणाऱ्या उर्फी जावेदने सगळीकडे नुसता कहर केला आहे. अतरंगी कपडे घालून उर्फी सगळ्यांना हैराण करून सोडते तर तिचे काही चाहतेही तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत असतात. तिच्या चाहत्यांना फिदा करण्यासाठी उर्फीने एक धमाकेदार लुक सोशल मीडियावर टाकला आहे आणि अक्षरक्षः सोशल मीडियावर कहर केला आहे. 

फॅशन आयकॉन उर्फी जावेद अनेकदा सोशल मीडियावर एक्टिव असते. तिचे बोल्ड आणि सुंदर फोटो आणि व्हिडिओ दररोज सोशल मीडियावर व्हायरल होतात. ती तिच्या कपड्यांवर काहीबाही एक्सपेरिमेंट करत राहते. पुन्हा एकदा उर्फीने असाच एक विचित्र व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तिने थ्रेड ब्रा घातली आहे. उर्फीचे चाहतेही तिच्या फोटो आणि व्हिडिओची सतत वाट पाहत असतात. दररोज तिचा लूक लोकांना चकित करतो. आता या नव्या ब्रा लुकमुळेही ती चांगलीच चर्चेत आहे. 

उर्फीने गुलाबी रंगाची ब्रा आणि डेनिम जीन्स घातली आहे. असा लुक यापुर्वी कोणीच केला नसेल. उर्फी जावेद या व्हिडिओमध्ये तिच्या आवडत्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तिचा हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचा हा व्हिडिओ आतापर्यंत एक लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

उर्फी जावेद अनेकदा तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर असे व्हिडिओ शेअर करत असते. अलीकडेच तिचा आणखी एक लूक समोर आला आहे ज्यामध्ये तिने रेझर ब्लेडने तिचा ड्रेस तयार केला आहे. उर्फीचा हा लूक सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल झाला.