Urfi Javed Laryngitis : उर्फी जावेद 'या' आजाराने त्रस्त; जाणून घ्या लक्षणे!

urfi javed suffering from laryngitis: काही दिवसांपासून उर्फीची तब्येत खालावल्याचं (Urfi javed health update) दिसून आलं होतं. उर्फीला दुबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली होती.

Updated: Dec 19, 2022, 09:33 PM IST
Urfi Javed Laryngitis : उर्फी जावेद 'या' आजाराने त्रस्त; जाणून घ्या लक्षणे! title=
Urfi Javed Laryngitis

Urfi Javed Laryngitis : सोशल मीडिया सेन्सेशनल आणि अतरंगी स्टार उर्फी जावेद (Urfi Javed) सोशल मीडियावर (Social Media) नेहमीच चर्चेत असते. मात्र मध्यंतरी उर्फी आजारी (Urfi Javed sick) पडल्याने सोशल मीडियावर फार क्वचितच सक्रिय होती. उर्फी जावेद सध्या दुबईत (Dubai) आहे. त्यानंतर आता उर्फी दुबईत उपचार घेत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे चाहत्यांचं टेन्शन वाढल्याचं पहायला मिळतंय. (urfi javed suffering from laryngitis marathi news)

काही दिवसांपासून उर्फीची तब्येत खालावल्याचं (Urfi javed health update) दिसून आलं होतं. उर्फीला ताप आणि उलट्यांचा त्रास जाणवत असल्याने तिला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आता तिला दुबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता उर्फी एका आजाराचा सामना करत असल्याचं दिसतंय.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Uorfi (@urf7i)

दुबईत पोहोचताच लॅरिन्जायटीस या आजाराने त्रस्त (urfi javed suffering from laryngitis) असल्याचं समजतंय. त्यामुळे डॉक्टरांनी तिला आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. माझा अर्धा खर्च तर या आजारातून बरा होण्यात खर्च झाला, अशी पोस्ट उर्फीने (Urfi javed Post) केली होती. त्यामुळे तिला बोलण्यास सक्त मनाई केली असल्याचं देखील समजतंय.

आणखी वाचा - Urfi Javed Sister: उर्फी शेर तर डॉली सव्वाशेर, बहिणीपेक्षाही निघाली खुपच बोल्ड, पाहा Photo

दरम्यान, घशात होणारी जळजळ, घशाला सूज येणे आणि घशाला इन्फेक्शन होणं, अशी लक्षणं लॅरिन्जायटीस (laryngitis symptoms) या आजारात दिसून येतात. हा आजार गंभीर नसल्याने उर्फीच्या चाहत्यांनी सुटकेचा श्वास घेतलाय. वेळीच उपचार घेतले नाही तर आवाजामध्ये हळूहळू बदल होण्याची देखील शक्यता असतो. सिनेसृष्टीत काम करणाऱ्यांसाठी आवाज आणि लूक किती महत्त्वाचा असतो, हे वेगळं सांगण्याची गरज नाही.