उर्फी जावेदच्या एक्स बॉयफ्रेंडचं मोठं वक्तव्य; सांगितलं ब्रेकअपमागचं धक्कादायक कारण

 दोघांनी खूप कमी काळ एकमेकांना डेट केलं होते आणि नंतर हे दोघं वेगळे झाले. 

Updated: Jul 31, 2022, 04:28 PM IST
उर्फी जावेदच्या एक्स बॉयफ्रेंडचं मोठं वक्तव्य; सांगितलं ब्रेकअपमागचं धक्कादायक कारण title=

मुंबई : 'अनुपमा' या टेलिव्हिजन शोमध्ये समरची भूमिका साकारणारा  पारस कलनावत गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. 'अनुपमा'च्या निर्मात्यांनी अभिनेत्याचा करार रद्द केला आहे. खरंतर पारस 'झलक दिखला जा 10' या रिअॅलिटी शोचा भाग असणार आहे. नुकतच पारसने या शोबद्दल वक्तव्य केलं आहे. तसंच निर्मात्यांनी देखील यावर अधिकृत निवेदन दिलं आहे.

अनुपमा मधून बाहेर पडणं आणि 'झलक दिखला जा 10' मध्ये सहभागी होण्याव्यतिरिक्त, पारसने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या एक्स गर्लफ्रेंड उर्फ ​​जावेदबद्दल देखील वक्तव्य केलं आहे. वास्तविक याआधी, उर्फी जावेदने पारस कालनावतसोबत ब्रेकअप होण्या मागचं कारण त्याचं अतिप्रमाणात पजेसिव असणं सांगितलं होतं.

पारस कलनावत आणि उर्फी जावेद यांच्या नात्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. दोघांनी खूप कमी काळ एकमेकांना डेट केलं होतं आणि नंतर हे दोघं वेगळे झाले. पारस आणि उर्फी दोघंही 'मेरी दुर्गा' या शोमध्ये एकत्र दिसले होते. याआधी काही मुलाखतींमध्ये उर्फीने पारसला possessive म्हटलं होतं आणि अभिनेत्रीने असाही दावा केला होता की पारसने अनुपमाच्या निर्मात्यांना तिला शोमध्ये कास्ट न करण्यास सांगितलं होतं.

अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत पारसने उर्फीच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, "मला कोणाबद्दलही राग नाही किंवा कोणावरही कठोर भावना नाही. मला कोणाशी काही अडचण असेल तर मी त्याच्यासमोर जाऊन त्याच्याशी बोलेन आणि त्याच्याबद्दल वाईट बोलणार नाही. जेव्हा मी लोकांना माझ्याबद्दल बोलताना पाहतो तेव्हा मी ते शांतपणे घेतो. मी स्वतःच विचार करतो की, माझ्याबद्दल हे सर्व बोलून जर या व्यक्तीला चांगलं वाटत असेल तर मला त्याच्या आनंदात आनंद मिळेल. या सगळ्याचा माझ्यावर परिणाम होत नाही."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

उर्फी जावेद स्वतःशी संबंधित प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत मोकळेपणाने मांडलं, अशा परिस्थितीत पारसच्या या गोष्टींवर ती कशी प्रतिक्रिया देते हे पाहणं मनोरंजक असेल. वर्कफ्रंटवर बोलायचं झालं तर, उर्फी शेवटची 'बिग बॉस' ओटीटीमध्ये दिसली होती. ही अभिनेत्री तिच्या फॅशन सेन्ससाठी खूप प्रसिद्ध आहे. उर्फी रोज काही ना काही परिधान करून बाहेर पडते. त्यामुळे तिचे फोटो आणि व्हिडिओ काही मिनिटांत व्हायरल होतात आणि सगळीकडे तिचीच चर्चा सुरू होते.