रणवीर सिंगला न्यूड पाहून राखी सावंतला झाला आनंद, म्हणाली...

राखी सावंतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Updated: Jul 31, 2022, 04:26 PM IST
रणवीर सिंगला न्यूड पाहून राखी सावंतला झाला आनंद, म्हणाली... title=

मुंबई : सध्या बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आहे. रणवीरनं पेपर मॅगझिनसाठी न्यूड फोटोशूट करून खळबळ उडवून दिली होती. त्यावरून काही लोकांनी त्याचा विरोध केला तर काही लोक त्याच्या समर्थनाथ पुढे आले. रणवीरनं नुकतेच पेपर मॅगझिनसाठी हे बोल्ड फोटोशूट केले. 'अश्लीलता कायदा' 67(A) अंतर्गत त्याच्याविरुद्ध मुंबईत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच, या प्रकरणाची त्वरीत दखल घेत रणवीरवर अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी त्याला अभिनेत्री आणि ड्रामा क्विन राखी सावंतनं त्याला पाठिंबा दिला होता. आता पुन्हा एकदा राखीनं रणवीरच्या न्यूड फोटोशूट मजेशीर रिअॅक्ट केलं आहे. 

इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून राखीचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत राखी रणवीरला पाठिंबा देत असल्याचे दिसत आहे. 'मित्रांनो, मी खूप दमले आहे. खरोखर खूप दमले आहे. मी नुकतीच दुबईहून परतले आहे आणि तरीही मी फक्त रणवीर सिंगच्या न्यूडिबद्दल ऐकते. अहो सर्व मुली पूर्णपणे न्यूड होऊन कॅमेऱ्यासमोर येतात. जर एक रणवीर सिंग आला आहे तर देशातल्या किती मुलींवर त्यानं मेहरबानी केली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

राखी सावंत म्हणाली, "आमच्या डोळ्यांना, हृदयाला खूप चांगल वाटलं की आम्ही एका मुलाला न्यूड पाहिले. किती हँडसम दिसतोय तो. रणवीर तुला माझीच नजर नको लागायला. यानंतर व्हिडीओत राखी 'हाय गरमी' हे गाणं गाते आणि बोलते की रणवीर तू असे फोटोशूट कर. मला तुला असे पहायचे आहे.

यादरम्यान, राखी सावंतनं रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटबाबतही चर्चा केली. रणवीर सिंग न्यूड होण्याचे कारण राखी सावंतने या व्हिडीओत सांगितले आहे. जेव्हा पापाराझींनी राखी सावंतला रणवीर सिंगच्या न्यूड फोटोबद्दल प्रश्न केला तेव्हा राखी संतापली आणि म्हणाली की, 'तुम्हाला नग्न वाटतं, तुमचे डोळे नग्न आहेत. मला कुठूनही तो नग्न होताना दिसत नाही. माझ्या रणवीर मित्राबद्दल कोणी काहीही बोलणार नाही. आदिलही काही बोलू शकत नाही.'