Twinkle Khanna : ट्विंकल खन्नाचा लेकीबाबत धक्कादायक खुलासा, कोरोना महामारीच्या काळात मी तिला...!

Twinkle Khanna : ट्विंकल खन्ना ही गेल्या काही वर्षापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. अक्षय कुमारशी लग्न केल्यानंतर ट्विंकल खन्नाने बॉलिवूडला कायमचा अलविदा केला. 

Updated: Mar 20, 2023, 09:13 AM IST
Twinkle Khanna : ट्विंकल खन्नाचा लेकीबाबत धक्कादायक खुलासा, कोरोना महामारीच्या काळात मी तिला...!
Twinkle Khanna Akshay Kumar

Twinkle Khanna : बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना ही कायम कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. ट्विंकल खन्ना अनेकदा आपल्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना दिसते. ट्विंकल खन्नाही चित्रपटांपासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. ट्विंकल खन्नाने अभिनेता अक्षय कुमारशी लग्न केल्यानंतर बॉलिवूडला कायमचा अलविदा केला. तसेच ती विविध कार्यक्रमात सहभागी होत आपली मतं ठामपणे मांडत असते. नुकतेच तिनेम कोरोना काळातील आपल्या मुलीसोबतचा किस्सा शेअर केला. 

2020 साली आलेल्या कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगाचे चित्र बदल होते. कोरोनामुळे सर्वसामान्यांपासून ते अगदी चित्रपटसृष्टीतीलही मानवी जीवन विस्कळीत झाले होते. याचदरम्यान ट्विंकल खन्ना हीने 'खाना खजाना' फेम संजीव कपूरच्या चॅट शो यांच्या कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. यावेळी कोरोना काळातील काळात लॉकडाऊनवर चर्चा झाली. त्यावर ट्विंकल खन्नाने आपल्या मुलीबद्दल मोठा खुलासा केला. ज्यावेळी कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. त्यावेळी ट्विंकल खन्ना ही मुलगी नितारा हिला दररोज फक्त पीनट बटर सँडविच खायला देत होती. कारण तिला स्वयंपाक करता येत नव्हता. असं स्पष्टीकरण तिने या कार्यक्रमात दिले. मला स्वयंपाक कसा करायचा हे माहित नव्हतं. त्याचवेळी पती अक्षय कुमारने ही स्वयंपाक बनवण्यास नकार दिला होता. 

ट्विंकलने सांगितले की, नितारा मोठी झाल्यावर तिला थेरपीची गरज भासू शकते. कारण लॉकडाऊन दरम्यान ती निताराला फक्त एकच खाऊ घालायची. अभिनेत्री म्हणाली की, साथीच्या काळात मला स्वयंपाक करता येत नसल्याने मी तिला रोज पीनट बटर सँडविच देत होते. आता मला वाटते की ती मोठी होईल तेव्हा थेरपीला जाईल आणि डॉक्टरांना सांगेल की, इतर मुलांचे पालक पास्ता, केळी ब्रेडसह स्वादिष्ट जेवण बनवत होते, परंतु माझी आई मला फक्त पीनट बटर आणि टोस्ट खाऊ घालत होती.

ट्विंकलचा बरसात हा पहिला चित्रपट हीट ठरला. जान, दिल तेरा दीवाना, उफ ये मोहब्बत, जब प्यार किसीसे होता है या चित्रपटांमध्ये ट्विंकल खन्ना ही महत्त्वाच्या भूमिकेत होती. मात्र या चित्रपटांना काही खास धमाल करता आली नाही. तसेच ट्विंकल खन्ना ही बॉलिवूड चित्रपटांपासून लांब गेलीये. मात्र सोशल मीडियावर ट्विंकल खन्ना ही कायमच सक्रिय असते.