Shah rukh Khan: शाहरुख खानसोबत गौरी खानने लगावले ठुमके; Aalana Pandey च्या लग्नातील INSIDE VIDEO व्हायरल!

Ananya Panday Wedding Video:अलाना पांडेच्या लग्नातील एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात शाहरुख खान (Shah rukh khan) आणि गौरी खानचा (Gauri khan) डान्स करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.

Updated: Mar 19, 2023, 10:30 PM IST
Shah rukh Khan: शाहरुख खानसोबत गौरी खानने लगावले ठुमके; Aalana Pandey च्या लग्नातील INSIDE VIDEO व्हायरल! title=
Shah rukh khan, gauri khan,video

Shah Rukh dance with Gauri: अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) हिची चुलत बहिण अलाना पांडे (Aalana Pandey) हिच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अलाना हिनं तिचा बॉयफ्रेंड इवोर मैकक्रे याच्याशी भारतीय प्रथा-पद्धतीनं लग्न केलंय. या लग्नसोहळ्यात अनेक बॉलिवूड दिग्गजांनी हजेरी लावली होती. मात्र, लग्नातील खास आकर्षण होतं, बॉलिवू़डचा किंग शाहरूख (Shah rukh khan) आणि गौरी खान (Gauri khan) यांचा डान्स.

शाहरुख खान, गौरी, आर्यन, महिमा चौधरी, जॅकी श्रॉफ आणि मनीष मल्होत्रा यांनी हजेरी लावली होती. लग्नातील चंकी पांडेच्या डान्स व्हिडिओ (Chunky Pandey Dance Video) व्हायरल झाला होता. अशातच आता शाहरूख खान आणि गौरी खान यांचा डान्स व्हिडिओ देखील तुफान व्हायरल (Viral Video) होताना दिसत आहे. लग्नाच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये शाहरुख खानचा पत्नी गौरीसोबत डान्स (Shahrukh Gauri Dance Video) करताना दिसतोय. ज्यामध्ये अनन्या देखील दिसत आहे.

पाहा VIDEO -

व्हायरल व्हिडिओमध्ये किंग खान नवरी अलाना पांडेला मिठी मारताना दिसत आहे. त्याचबरोबर इवोरला देखील त्याने मिठी मारली आणि कपाळावर चुंबन घेतलंय. मुंबईत अलाना आणि इवरसाठी वेडिंग रिसेप्शन (Wedding Reception) आयोजित करण्यात आलं होतं. त्यावेळी शाहरुख आणि गौरीने आपल्या डान्सची झलक दाखवली. त्याचबरोबर दोघांनी मिळून नवरा नवरीला आशीर्वीद देखील दिले आहेत.

आणखी वाचा - Shahrukh Khan Divorce : शाहरुख खान आणि गौरी घेणार घटस्फोट? गौरी म्हणाली, ''त्याला माझ्यासोबत...''

Ananya Panday चा ग्लॅमरस लूक 

अनन्याने बहिणीच्या लग्नात डिझायनर साडी नेसली होती. तिचा ग्लॅमरस लूक (Ananya Panday Wedding look) पाहून अनेकांना तिच्या सौंदर्याची भुरळ पडली. अनन्याने तिच्या बहिणीच्या लग्नात 1991 मध्ये आलेल्या 'विश्वात्मा' चित्रपटातील 'सात समुद्र पार' या गाण्यावर जबरदस्त डान्स केलाय. त्याचा व्हिडिओ देखील इंटरनेटवर धुमाकूळ घातलोय.