Shocking अक्षय कुमारनं केलेल्या 'त्या' कृत्यामुळे ट्विंकल खन्नाला झाली होती अटक!

ट्विंकलनं एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. 

Updated: Nov 14, 2022, 05:37 PM IST
Shocking अक्षय कुमारनं केलेल्या 'त्या' कृत्यामुळे ट्विंकल खन्नाला झाली होती अटक! title=

Twinkle Khanna Got Arrested Once because of Akshay Kumar : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या त्याच्या मुलाखतीमुळे आणि 'हेरा फेरी 3' चित्रपटामुळे चर्चेत आहे. अलीकडेच एका मुलाखती दरम्यान अक्षयने त्याच्या नागरिकत्वाबद्दल ट्रोल करणाऱ्यांना प्रत्युत्तर देऊन थांबवले. तो म्हणाला की, 'कॅनडियन पासपोर्ट असण्याचा अर्थ मी भारतीय नाही असा होत नाही. मी भारतीय आहे. पण अक्षय कुमार वादाच्या भोवऱ्यात अडकणं ही पहिली गोष्ट नाही तर या आधी देखील अक्षय ट्रोल झाला आहे. त्याच्याशी संबंधित असाच एक वाद आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अक्षय आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) यांच्याशी एक वाद आहे.

एका मुलाखतीत ट्विंकल खन्नाने तो जुना किस्सा शेअर केला होता. हा किस्सा मीडियातदेखील चांगलाच गाजला. एका फॅशन शो वेळीचा हा जुना किस्सा असून यावेळी अक्षय कुमार एका जीन्ससाठी रॅम्प वॉक करणार होता. यावेळी अक्षयने ट्विकलला काही सूचना दिल्या होत्या. या रॅम्प वॉकमध्ये अक्षय कुमारने ट्विंकल खन्नाला त्याच्या जीन्सचं बटन उघडण्यास सांगितलं होतं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्या जीन्सचं नावचं ‘अनबटन्ड’ असल्यानं अक्षयने हा हट्ट धरला. खरं तर ट्विकल खन्नाने असं करण्यास साफ नकार दिला होता. मात्र रॅम्प वॉक वेळी अक्षय कुमार ट्विंकल जवळ आला आणि त्याने तिला बटन उघडण्याचा इशारा केला.जेव्हा ट्विंकल खन्नाने अक्षय कुमारच्या जीन्सचं बटन उघडण्यास नकार दिला तेव्हा त्याने तिचा हाथ पकडून तिला बटन उघडण्यास भाग पाडलं.

पुढे या मुलाखतीत ट्विकल खन्ना म्हणाली, “या रॅम्पवॉकच्या दुसऱ्या दिवशीच अक्षयला पद्मश्री सन्मान मिळणार होता. त्यासाठी आम्ही राष्ट्रपती भवनात पोहचलो. तिथे पोहचताच मला आई डिंपल मेसेज आला की, पोलिसांकडे तुझं अरेस्ट वॉरंट आहे आणि ते तुला शोधत आहेत.” असं ती म्हणाली. एवढचं नाही तर ही केस अजूनही सुरु असल्याचं ट्विंकल म्हणाली होती.

तर या प्रकरणी ट्विंकल खन्नाला एकटीलाच दोषी ठरवण्यात आलं होतं. 500  रुपये दंड भरून ट्विंकलला नंतर जामिन मंजूर झाला होता.