Tunisha Sharma Property: अवघ्या 20 व्या वर्षी तुनिषाने कमावली एवढी संपत्ती, जाणून घ्या आता कोणाला मिळणार?

Tunisha Sharma Suicide Case: अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी आपले नाव कमावले. खूप कमी वयात चांगला पैसा कमावला होता.

Updated: Dec 28, 2022, 04:33 PM IST
Tunisha Sharma Property: अवघ्या 20 व्या वर्षी तुनिषाने कमावली  एवढी संपत्ती, जाणून घ्या आता कोणाला मिळणार? title=

Tunisha Sharma Property: टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) हिच्या मृत्यूप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. तिच्या मृत्यूबाबत रोज नवनवीन खुलासे होत आहेत. अवघ्या 20 व्या वर्षी तुनिषाच्या हिच्या मृत्यूची बातमी संपूर्ण कलाविश्वाला हादरुन गेली असून सर्वांनाच धक्का बसला आहे.  

कुटुंबातील एकमेव कमावती सदस्य

तुनिषा शर्मा ही तिच्या कुटुंबातील एकमेव कमावती सदस्य होती आणि तिच्या मागे तिची आई आहे. तुनिषा हिच्या मृत्यूनंतर पूर्णपणे ती खचली आहे. पोलीस आज (28 डिसेंबर) तुनिषा हिच्या घरी जाऊन तिच्या आईचे जबाब नोंदवू शकतील, असे वृत्त आहे. तुनिषाच्या आईने शीझानवर दुसऱ्या मुलीसोबत अफेअर असल्याचा आणि तुनिषाची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.

तुनिषाने 15 कोटींची संपत्ती मागे ठेवली

तुनिषा शर्मा हिने वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी चांगले नाव कमावले होते, खूप कमी वयात खूप पैसा कमावला होता. मृत्यूनंतर तुनिषाने सुमारे 15 कोटी रुपयांची संपत्ती (Tunisha Sharma Property worth Rs 15 Crore) मागे ठेवली आहे. रिपोर्टनुसार, तुनिषाच्या नावावर एक अपार्टमेंटही आहे.

आता संपूर्ण मालमत्ता कोणाला मिळणार?

तुनिषा शर्मा याच्या वडिलांचे आधीच निधन झाले होते आणि तिच्या कुटुंबात तिची फक्त आई आहे. तुनिषाची आई वनिता शर्मा गृहिणी असून आता फक्त त्यांनाच तुनिषाची संपत्ती मिळणार आहे. तुनिषाच्या कमाईनेच त्यांचे घर चालायचे.

वयाच्या 20 व्या वर्षी जगाचा निरोप 

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. तुनिषाने 24 डिसेंबर रोजी तिच्या अली बाबा: दास्तान-ए-काबुल या टीव्ही शोच्या सेटवर मेकअप रुममध्ये गळफास लावून आत्महत्या केली. यानंतर पोलिसांनी तुनिषाचा प्रियकर आणि अभिनेता शीझान खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

शवविच्छेदन अहवालातून महत्त्वाचा मोठा खुलासा 

टीव्ही कलाकार आणि अभिनेत्री तुनिषा शर्मा हिच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन अहवालातून महत्त्वाचा मोठा खुलासा झाला आहे.  (Tunisha Sharma Death) 5 डॉक्टर्सच्या पॅनेलकडून शवविच्छेदन करण्यात आले आहे. या अहवालातून तिच्या मृत्यूचे खरं कारण समोर आले आहे. मुंबईतील  जे.जे. रुग्णालयात तुनिषा शर्माच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आले आहे. तिचा श्वास कोंडल्यानेच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. फास लागल्यानेच तुनिषाचा मृत्यू झाल्याचं समोर आले आहे. दरम्यान, तुनिषाच्या शरीरावर कोणत्याही जखमा नाहीत, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. तुनिषाच्या शवविच्छेदन अहवालातून महत्त्वाचा खुलासा झालाय.