बाबा लगिन...! 'तारक मेहता...' फेम 'अय्यर' वयाच्या 42 व्या वर्षी चढणार बोहल्यावर; होणारी पत्नी बबिताहूनही देखणी

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : छोट्या पडद्यावर काही मालिका इतक्या लोकप्रिय होतात, की त्या मालिकांची पात्र प्रेक्षकांना आपल्या मनाच्या अगदी जवळची वाटू लागतात. 

Updated: Dec 28, 2022, 02:39 PM IST
बाबा लगिन...!  'तारक मेहता...' फेम 'अय्यर' वयाच्या 42 व्या वर्षी चढणार बोहल्यावर; होणारी पत्नी बबिताहूनही देखणी title=
TMKOC taarak mehta ka ooltah chashmah serial fame iyer to get married at the age of 42

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : छोट्या पडद्यावर काही मालिका इतक्या लोकप्रिय होतात, की त्या मालिकांची पात्र प्रेक्षकांना आपल्या मनाच्या अगदी जवळची वाटू लागतात. या मालिकांमधीलच एक नाव म्हणजे, 'तारक मेहता का उल्टा चष्मा'. मुंबईतील एक सोसायटी, तिथे राहणारे रहिवासी आणि त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींभोवती ही मालिका फिरते. यामध्ये असणारं प्रत्येक पात्र रसिकांना आपल्यातलंच वाटतं. मग ते बाबुजी असो, सोढी असो किंवा मग अय्यर (iyer ral name). काल्पनिक पात्रांना या मालिकेच्या माध्यमातून कलाकारांनी जीव ओतून छोट्या पडद्यावर साकारलं आहे. यातल्याच एका कलाकाराच्या प्रत्यक्ष आयुष्याला येणाऱ्या वर्षात कलाटणी मिळणार आहे. 

के कृष्णन सुब्रमण्यम अय्यर म्हणजेच अभिनेता तनुज महाशब्दे (Tanuj Mahashabde) येत्या काळात लग्नबंधनात अडकणार आहे. त्याची होणारी पत्नी कोण? बबिता...? छे हो! ती तर त्याची ऑनस्क्रीन पत्नी आहे. पण, प्रत्यक्ष आयुष्यात तनुज बोहल्यावर चढण्यासाठी सज्ज झाला आहे. बबिता म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) हिच्याहूनही त्याची होणारी पत्नी देखणी असल्याचं म्हटलं जात आहे. वयाच्या 42 व्या वर्षी तनुजच्या आयुष्याला मिळणारी ही कलाटणी त्याच्यासाठी अद्वितीय आनंद आणणारी असेल असंच म्हणावं लागेल. (Tanuj Mahashabde wedding)

तनुज म्हणजेच ऑनस्क्रीन अय्यरची होणारी पत्नी नेमकी कशी दिसते, असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर त्याचं उत्तर आम्हीही देऊ शकत नाही. कारण, अद्यापही तिचा कोणताही फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. पण, तिच्या रुपाची चर्चा मात्र आतापासूनच सुरु झाली आहे. त्यामुळं आता अय्यरची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन पत्नी सुंदर हे तुम्हीच येत्या काळात ठरवा. 

खऱ्या आयुष्यातही ऑनस्क्रीन 'बबिता'ला डेट करतोय तनुज? 

ऑनस्क्रीन बबिताच्या सौंदर्याच्या चर्चा राहिल्या दूर, पण तुम्हाला माहितीये का; चर्चा तर अशीही आहे की तनुज आणि मुनमुन खऱ्या आयुष्यात रिलेशनशिपमध्ये आहेत. या दोघांनीही या अफवा असल्याचं या चर्चा उधळून लावल्या आहेत. 

हेसुद्धा वाचा : Viral Video : पार्टीला येतानाच 'टल्ली' मग जाताना काय अवस्था? सलमानच्या वहिनीला पाहणारे हैराण

सूत्रांच्या माहितीनुसार तनुज आणि मुनमुन या दोघांनीही त्यांच्यामध्ये असणारी ऑफस्क्रीन मैत्री कधीच नाकारली नाही. मुद्दा असा, की खुद्द तनुजही आपल्याला ऑनस्क्रीन इतक्या सुंदर अभिनेत्रीच्या पतीची भूमिका साकारायला मिळतेय हे ऐकून थक्क होता. 

'तारक मेहता...' तनुजचं 14 वर्षांचं नातं

छोट्या पडद्यावर कमालीची लोकप्रिय असणारी ही मालिका गेल्या कैक वर्षांपासून सर्वांच्या मनाचा ठाव घेत आहे. खुद्द तनुज महाशब्देसुद्धा गेल्या 14 वर्षांपासून या मालिकेशी जोडला गेला आहे. जेठालालशी त्याची होणारी तू तू मै मै प्रेक्षकांना पहिल्या दिवसापासून हवीहवीशी वाटतेय. तुम्ही वाचून हैराण व्हाल, पण तनुजची निवड पटकथा लेखक आणि सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करण्यात आली होती. पण, जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी यांनी दिलेल्या सल्ल्यानंतर मालिकेत 'अय्यर' हे पात्रही जोडलं गेलं आणि मालिकेत आणखी एक खास एंट्री झाली.