'टोटल धमाल' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

सिनेमात कोबरा, वन्यप्रणी त्याचप्रमाणे वाघ सुद्धा दिसणार आहे.

Updated: Jan 21, 2019, 04:44 PM IST
'टोटल धमाल' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित title=

मुंबई: अजय देवगन, अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या कॉमेडी सिनेमा 'टोटल धमाल' ट्रेलर प्रदर्शित झाला. इंद्र कुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या 'धमाल' सीरिजचा तिसरा सिनेमा आहे. 'टोटल धमाल' सिनेमात अजय देवगन, अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्यासोबत रितेश देशमुख, अर्शद वारसी, जावेद जाफरी, संजय मिश्रा, आणि  पीतोबाश हे कलाकार  सिनेमात झळकणार आहे. सिनेमात कोबरा, वन्यप्रणी त्याचप्रमाणे वाघ सुद्धा दिसणार आहे.

 

'टोटल धमाल' सिनेमाच्या माध्यमातून तगडी स्टारकास्ट चाहत्यांच्या भेटीला आली आहे. सिनेमाचा ट्रेलर खूपच मजेदार आहे. सिनेमात चाहत्यांना 50 कोटी रुपयांचा गडबड घेटाळा अनुभवता येणार आहे. आणि 50 कोटी रुपयांच्या मागे सगळे पळताना दिसणार आहेत. अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित गुजराती कपल म्हणून चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. 
 
 सिनेमाची खास गोष्ट म्हणजे हॉलिवूड अभिनेत्री क्रिस्टल सिनेमात झळकणार आहे. एका माकडाची भूमिका ती साकारणार आहे. 'हॅंगओवर 2', 'जॉर्ज ऑफ द जंगल', 'नाइट अॅट द म्यूझियम' या हॉलिवूड सिनेमांमध्ये दिसली होती. सूत्रांच्या सांगण्यानुसार क्रिस्टल सिनेमात मुख्य भूमिका साकारणार आहे. 'टोटल धमाल' सिनेमा 22 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.