नैराश्याबद्दल जनजागृती करण्यासाठी अरिजितने उचललं पाऊल !

आजकालच्या बदललेल्या आणि गुंतागुंतीच्या जीवनशैलीमुळे नैराश्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 28, 2017, 10:36 PM IST
नैराश्याबद्दल जनजागृती करण्यासाठी अरिजितने उचललं पाऊल ! title=
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

मुंबई : आजकालच्या बदललेल्या आणि गुंतागुंतीच्या जीवनशैलीमुळे नैराश्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यात अगदी दीपिका, करण, इलियाना यांसारखे अनेक बॉलिवूड स्टार्स यांचा देखील समावेश आहे. दिवसागणित वाढणाऱ्या या मानसिक आजाराबद्दल सामान्य माणसाला माहिती मिळावी, त्याबद्दल जनजागृती व्हावी. म्हणून गायक अरिजित सिंगनं एक पाऊल उचललं आहे. ही जनजागृती करण्यासाठी तो गाणार आहे.

मानसिक आजारांबद्दल जास्तीत जास्त लोकांना माहिती व्हावी यासाठी मुंबईत तो एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये गाणार आहे. सध्या जगाची परिस्थिती बघता आपल्याला त्रास होणाऱ्या गोष्टींविरुद्ध एकत्र येऊन आपण लढायला हवं, असं अरिजित म्हणतो.