'ही' आहे आमिरच्या आयुष्यातील सर्वात आव्हानात्मक भूमिका !

आपली प्रत्येक भूमिका ताकदीने निभावणारा बॉलिवूडचा मिस्टर परफेशनिस्ट आमिर खानसाठी कोणती भूमिका आव्हानात्मक असेल ?

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 28, 2017, 07:40 PM IST
'ही' आहे आमिरच्या आयुष्यातील सर्वात आव्हानात्मक भूमिका ! title=

नवी दिल्ली : आपली प्रत्येक भूमिका ताकदीने निभावणारा बॉलिवूडचा मिस्टर परफेशनिस्ट आमिर खानसाठी कोणती भूमिका आव्हानात्मक असेल ?  खरंतर यावर कोणाचा विश्वास बसत नाही पण, आमिरसाठीसुद्धा काही भूमिका आव्हानात्मक ठरल्या आहेत. खुद्द आमिरनेच त्याच्या एका आव्हानात्मक भूमिकेचा खुलासा केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओतून त्याने हा खुलासा केला आहे. 

 या व्हिडिओमध्ये आमिर आणि त्याचे सहकारी भूमिकेबद्दल सांगत आहेत, ती भूमिका आहे ‘सिक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटातील. या चित्रपटात तो साकारत असलेल्या व्यक्तीरेखेचं नाव आहे ‘शक्ती कुमार’. 

हा व्हिडीओ शेअर करताना त्याने लिहिले, "माझ्या आयुष्यातील सगळ्यात कठीण भूमिकांपैकी एक." या व्हिडिओच्या सुरुवातीला गायिका-अभिनेत्री मोनाली ठाकूर दिसत आहे. या चित्रपटातील आमिरचा लूक खूप आवडला, असे त्यांनी सांगितले. यामध्ये आमिरचा लूक जरा हटकेच आहे. दिवाळीला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या प्रसिद्धीला आता सुरुवात झाली आहे. 

आमिरच्या या भूमिकेबद्दल त्याची पत्नी आणि निर्माती किरण राव हीने सांगितले की, "या चित्रपटात आमिर अपयश वाटी आलेल्या एका संगीत दिग्दर्शकाची भूमिका करत आहे. अशाप्रकारच्या भूमिका वारंवार मिळत नाहीत." याबद्दल आमिरने सांगितले की, "मला खूप मज्जा आली कारण या व्यक्तिरेखेत वेडेपणा आहे." ‘सिक्रेट सुपरस्टार’  हा चित्रपट १९ ऑक्टोबरला प्रदर्शित होईल.