Starkid Still the limnelight at Anurag Kashyap Daughter Aaliyah's Wedding : बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपची लेक आलिया कश्यप ही नुकतीच लग्न बंधनात अडकली आहे. त्यानिमित्तानं त्यांनी रिसेप्शन पार्टी देखील ठेवली होती. त्या रिसेप्शन पार्टीत इंडस्ट्रीतील अनेक स्टारकिड्सनं हजेरी लावली होती. याशिवाय अनेक सेलिब्रिटी हे त्यांच्या कुटुंबासोबत दिसले. या पार्टीत एका स्टारकिडनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे आणि ते स्टारकिड्स म्हणजे सुहाना खान किंवा खुशी कपूर नाही, तर ती दुसरी कोणी नसून अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची लेक आहे.
आलिया कश्यपच्या रिसेप्शन पार्टीतील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या लग्नात अनुरागची एक्स वाईफ अर्थात पूर्वाश्रमीची पत्नी कल्कि केकलानं देखील हजेरी लावली होती. अनुराग कश्यपच्या लग्नात आणि रिसेप्शन पार्टीत कल्कि दिसली. तर नवाजुद्दीनच्या लेकीनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. आलियाच्या रिसेप्शनमध्ये शोराला पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
शोरानं यावेळी पारंपारिक कपडे परिधान केले होते. नवाजुद्दीनची लेक शोराला पाहताच नेटकरी कमेंट करत म्हणाले, 'ही किती सुंदर आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'ही नवाजुद्दीनची लेक आहे? किती सुंदर आहे ही.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'ती नक्कीच इंडस्ट्रीमध्ये येईल. ही नक्कीच सगळ्या स्टारकिड्सना मागे टाकेल.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'त्याची लेक इतकी सुंदर आहे हे आजवर कोणाला माहित नव्हतं.'
हेही वाचा : दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ति अखेर लग्नबंधनात अडकली, 15 वर्षे रिलेशनशिपनंतर...
दरम्यान, आलिया कश्यप अखेर तिच्या लॉन्ग टाइम बॉयफ्रेंड शेन ग्रेगोइरेसोबत लग्न बंधनात अडकली आहे. काल त्यांनी लग्नाची रिसेप्शन पार्टी ठेवली होती. तर त्यांच्या या लग्न समारंभात आणि रिसेप्शन पार्टीत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या पार्टीत सुहाना खान, खुशी कपूर, अगस्त्य नंदा, अभिषेक बच्चन, इम्तियाज अलीची लेक इदा अली हे स्टारकिड्स उपस्थित होते. याच्याशिवाय नुकतेच लग्न बंधनात अडकलेले शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य देखील त्यांच्या रिसेप्शन पार्टीत सहभागी झाले होते. तर आलियाच्या मैत्रिणी या सगळ्या एका खास अंदाजात दिसल्या. त्यांनी टीशर्ट आणि जिन्स परिधान केलं होतं. तर त्यांनी परिधान केलेल्या टी-शर्टवर आली की शादी असं लिहिलेलं होतं. त्यांच्या या हटके लूकनं देखील सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.