सुपरस्टार ते बिझनेसमन 7 वेळा अफेयरच्या चर्चा! 43 व्या वर्षी अविवाहीत असणाऱ्या 'या' अभिनेत्रीला ओळखलंत का?

Actress Mysterious Love Life Affairs: अभिनेत्रीच्या होत्या 7 अफेयर्सच्या चर्चा तर वयाच्या 43 वर्षी देखील आहे सिंगल...

दिक्षा पाटील | Updated: Dec 6, 2024, 05:50 PM IST
सुपरस्टार ते बिझनेसमन 7 वेळा अफेयरच्या चर्चा! 43 व्या वर्षी अविवाहीत असणाऱ्या 'या' अभिनेत्रीला ओळखलंत का?  title=
(Photo Credit : Social Media)

Anushka Shetty Mysterious Love Life Affairs: सेलिब्रिटी एकामागेएक नवे चित्रपट करताना दिसतात. पण चित्रपटांपेक्षा सगळ्यात जास्त चर्चा ही त्यांच्या अफेयर्सच्या असतात. जीनत अमान, रेखा ते सुष्मिता सेन सगळ्याच सेलिब्रिटींचं खासगी आयुष्य हे नेहमीच चर्चेत असतं. त्यांच्या चित्रपटांपेक्षा त्यांचं खासगी आयुष्य हे त्यांच्या कामापेक्षा जास्त चर्चेत असतं. पण तुम्ही त्या अभिनेत्रीला ओळखता का जिचं नाव हे अभिनेता, क्रिकेटपटू ते बिझनेसमॅन सगळ्यांसोबत जोडण्यात येईल. 43 वर्षांच्या या अभिनेत्रीचं लव्ह अफेयर हे एका मिस्ट्रीप्रमाणे आहेत. चला तर आज तिच्याविषयी जाणून घेऊया.

या अभिनेत्रीविषयी बोलायचं झालं तर ही दाक्षिणेतील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या अभिनयानं तिनं सगळ्यांची मने जिंकली. ही अभिनेत्री ही 120 कोटींच्या संपत्तीची मालकीन आहे. या अभिनेत्रीचं नाव अनुष्का शेट्टी आहे. अनुष्का शेट्टीनं माउंट कार्मेल कॉलेजमधून कंप्युटर अ‍ॅप्लीकेशनमध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे. अभिनयात करिअर करण्याआधी अनुष्का योगा शिकवायची. 

अनुष्कानं 2005 मध्ये 'सुपर' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर तिनं 'लक्ष्यम', 'शौर्यम' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अनुष्कानं डार्क फॅन्टेसी चित्रपट 'अरुंधति' मध्ये डबल रोल साकारले होते. तिच्या करियरची आतापर्यंत सगळ्यात कोणता चांगला चित्रपट असेल तर तो एसएस राजामौली यांचा बाहुबली आहे. या सीरिजमध्ये तिनं 'राजकुमारी देवसेना' ची भूमिका साकारली होती. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये अनुष्काचं नावं येतं. इतकंच नाही तर तिला दाक्षिणेच क्वीन देखील बोलतात. 

इतर अभिनेत्रींप्रमाणे अनुष्काचं नाव देखील अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. तिचं नाव प्रभास, नागा चैतन्य, कृष जगरलामुडी, गोपीचंड या कलाकारांसोबत जोडण्यात आलं तर क्रिकेटपटू राहुल द्रविडसोबत जोडण्याक आलं. यानंतर अनुष्काचं नाव बिझनेसमॅनशी देखील जोडण्यात आलं आहे. प्रभाससोबत तिचं रिलेशनशिप हे अनेक दिवस चर्चेत होतं. खरंतर, बाहुबलीच्या प्रदर्शनानंतर त्या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या लिंकअपच्या चर्चा देखील बंद झाल्या आहेत. 

हेही वाचा : Amber Heard लवकरच होणार आई; जॉनी डेपसोबत घटस्फोटाच्या 7 वर्षानंतर प्रेग्नंट

राहुल दव्रिडशी नाव जोडण्याचं कारण म्हणजे अनुष्कानं सांगितलं होतं की तो तिचा क्रश आहे. तेव्हापासून त्या दोघांच्या नावाची चर्चा रंगली होती. अनुष्काच्या 7 अफेयर्सच्या चर्चा रंगल्या होत्या. इतकं असलं तरी देखील वयाच्या 43 व्या वर्षी अनुष्का ही अविवाहीत आहे.