'ही' अभिनेत्री होणार कतरिनाची वहिनी? वाचा कोण आहे ती...

कतरिनासोबत गेलेल्या जवळच्या मित्रांनी हजेरी लावली होती

Updated: Jul 18, 2022, 11:01 AM IST
'ही' अभिनेत्री होणार कतरिनाची वहिनी? वाचा कोण आहे ती... title=

मुंबईः नुकताच अभिनेत्री कतरिना कैफना आपला बर्थडे साजरा केला. ज्यात तिने विकी कौशल्यसह अनेक रॉमँण्टिक व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत. एवढंच नव्हे तर ते आणि त्यांचे फ्रेंड्स मालदीवला सुट्टी एन्जॉय करत आहे. त्यातले त्यांचे बीचवरचे फोटो हे व्हायरल झाले आहेत. 

बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफच्या मालदीवमधील वाढदिवसाला विकी कौशल आणि कतरिनासोबत गेलेल्या जवळच्या मित्रांनी हजेरी लावली होती. कतरिनाने तिचा वाढदिवस बहीण आणि भाऊ इसाबेल कैफ आणि सेबॅस्टियन लॉरेंट मिशेल, सनी कौशल आणि मिनी माथुर अशा काही मित्रांसह सेलिब्रेट केला. त्यांचे सगळे फोटो त्यांनी सोशल मीडियावरून शेअर केले आहेत. 

पण यात सगळ्या फोटोंमधून एक चेहरा दिसला आणि त्यामुळे व्हायरल होत असलेल्या फोटोंमधून त्या व्यक्तीच्या कनेक्शनबद्दल नाना तऱ्हेचे गेसेस लावले जात आहेत. तो चेहरा आहे अभिनेत्री इलियाना डिक्रूझ हिचा. नुकतेच समोर आलेले फोटो हे सगळ्यांना आश्चर्यचकित करणारे आहेत. तेव्हापासून अनेकांना प्रश्न पडला की इलियाना आणि कतरिना इतक्या जवळच्या मैत्रिणी कधी झाल्या? तर त्याचे उत्तर आहे कतरिनाचा भाऊ मॉडेल सेबॅस्टियन लॉरेंट मिशेल. कारण फोटोज अपलोड झाल्यापासून इलियाना डिक्रूझ कतरिनाचा भावाला सेबॅस्टिन लॉरेंट मिशेल याला डेट करत आहे की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. 

असे बोलले जाते आहे की इलियाना-सेबॅस्टियन सहा महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. ते अनेकदा कतरिना कैफच्या बांद्राच्या जुन्या अपार्टमेंटमध्ये तर कधी इलियानाच्या घरीच एकटा वेळ घालवतात. इलियाना डिक्रूझ आणि सेबॅस्टियन लॉरेंट मिशेल दोघेही एकमेकांना इन्स्टाग्रामवर फॉलो करतात. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सेबॅस्टियन हा प्रोफेशनल मॉडेल असून तो लंडनमध्ये राहतो. कतरिना कैफने विकी कौशलसोबत लग्न केल्यानंतर मात्र तो सध्या मुंबईत राहतोय. 

इलियाना याआधी ऑस्ट्रेलियन फोटोग्राफर अँड्र्यू नीबोनसोबत रिलेशनशिपमध्ये होती. ज्यात ती सिरियस रिलेशनशिपमध्ये होती. इलियाना नुकतीच अभिषेक बच्चनसोबत 'बिग बुल' फिल्ममध्ये दिसली होती. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x