करण जोहरवर लेखिकेचे गंभीर आरोप!! वाचा काय आहे प्रकरण

करन जोहरचा 'कॉफी विथ करन' हा सर्वात जास्त कॉर्ट्रोवर्शल शो आहे.

Updated: Jul 18, 2022, 10:24 AM IST
करण जोहरवर लेखिकेचे गंभीर आरोप!! वाचा काय आहे प्रकरण title=

मुंबईः करन जोहरचा 'कॉफी विथ करन' हा शो नव्या लुकमध्ये पुन्हा एकदा सुरू झाला आहे. पण यावेळी तो टेलिव्हिजनवर न येता ओटीटीवर आला आहे. करन जोहरचा 'कॉफी विथ करन' हा सर्वात जास्त कॉर्ट्रोवर्शल शो आहे. आजपर्यंत करन आणि त्याच्या या शोवर अनेकांनी टिका केली आहे. त्यातून करनला सतत नेपोझिमचा शिकार व्हावे लागले आहे. 

करन जोहरचा 'कॉफी विथ करन' हा सर्वात जास्त लोकप्रिय शो आहे. नुकताच या शोचा सातवा सिझन सुरू झाला आहे. अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणवीर सिंगने या शोमध्ये पहिल्यांदाच हजेरी लावली होती. त्यानंतर आता नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये बॉलीवूडच्या नव्या बीएफएफ सारा अली खान आणि जान्हवी कपूर यांनी हजेरी लावली होती. 

हा शो सध्या चांगला लोकप्रिय होत असतानाच पुन्हा एकदा करनचा शो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एका लेखिकाने नुकतेच करनवर गंभीर आरोप केले आहे. तिने नुकतीच एक पोस्ट सोशल मिडियावर पोस्ट केली आहे ज्यात तिने करनने आपली आयडिया त्याच्या शोमध्ये चोरली आहे आणि ती आयडिया चोरूनही करनने तिच्या कामाचे क्रेडिटही शोमध्ये दिले नाहीये असं तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे. 

नुकत्याच झालेल्या शोच्या एपिसोडमध्ये सारा अली खान आणि जान्हवी कपूर आल्या होत्या. तेव्हा करनने त्यांना एक गेम खेळायला दिला होता. या गेममधून ठराविक अशा विचित्र कारणांसाठी लोकप्रिय असलेल्या सिनेमांची नावं त्या दोघींना ओळखायची होती. .

KWK सीझन 7 च्या दुसऱ्या एपिसोडमध्ये, सारा आणि जान्हवीला badly explained plots वरून सिनेमांच्या नावांचा अंदाज लवायचा होता. त्या दोघींना करन जोहरने त्याच्या 'कभी खुशी कभी गम' या सिनेमाचे नाव “a grown man who can’t tie his shoelaces ends up accidentally revealing his hidden identity to his former nanny.” या प्रश्नावरून ओळखायला सांगितले होते. 

लेखिका आणि पत्रकार मन्या लोहित अहूजा यांनी याच विषयावर दोन वर्षांपुर्वी एक आर्टिकल पब्लिशन केले होते. ज्यामध्ये करनने विचारलेला हूबेहूब प्रश्न त्यांनी लिहिला होता. करनच्या एपिसोडमधली हीच क्लिप अहूजा यांनी ट्विटरवरून शेअर केली आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की So #KoffeeWithKaran lifted the IP I started at @iDivaOfficial and used the whole copy verbatim??? I came up with this concept and I had a lot of fun writing these but to not be credited just because it was frivolous is not acceptable!?. 

त्यांनी इन्टाग्रामवरूनही करन जोहर आणि शोच्या क्रिएटिव्हसना जाब विचारणारी पोस्ट शेअर केली आहे.