टीव्ही अभिनेत्रीला मिळतायेत जीवघेण्या धमक्या, कारण जाणून बसेल धक्का

लोकप्रिय टीव्ही शोच्या अभिनेत्रीला गेल्या अनेक दिवसांपासून बलात्काराच्या धमक्या येत आहेत. 

Updated: Jan 17, 2022, 08:47 PM IST
टीव्ही अभिनेत्रीला मिळतायेत जीवघेण्या धमक्या, कारण जाणून बसेल धक्का title=

मुंबई : 'पंड्या स्टोर' या लोकप्रिय टीव्ही शोची अभिनेत्री Simran Budharup ला गेल्या अनेक दिवसांपासून बलात्काराच्या धमक्या येत आहेत. सोशल मीडियावर तिला घाणेरड्या कमेंट्स आणि बलात्काराच्या धमक्या देणारे बहुतेक लोक हे टीनएजर्स आहेत. याचा खुलासा खुद्द सिमरनने केला आहे. तिने सांगितलं की, शोमधील तिच्या नकारात्मक भूमिकेसाठी तिला मेसेज पाठवले जात आहेत. आता तिने यावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

सिमरनला  नाही तर शोची अभिनेत्री शायनी दोषी हिला सोशल मीडियावर टार्गेट केलं जात आहे. दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान, Simran Budharup म्हणाली, "मला टार्गेट करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. मला आठवतं की, जेव्हा माझ्या पात्राला थोडासा ग्रे शेड आला तेव्हा मी द्वेषपूर्ण कमेंट करायचे पण त्यावेळी मला वाटलं की, हे लोकं माझा नव्हे तर माझ्या पात्राचा तिरस्कार करत आहेत.

सिमरन पुढे म्हणाली, आता हे प्रकरण खूप वाढलं आहे आणि आता या धमक्या वैयक्तिक झाल्या आहेत. याचा सामना करण्यासाठी मी सज्ज झाली आहे. धमकी देणार्‍या बहुतेक प्रोफाईल  मुलं  तरुण आहेत ज्यांना ते कशाबद्दल बोलत आहेत हे देखील माहित नाही. या लोकांवर फक्त सोशल मीडियाचा प्रभाव असतो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

लिगल एक्शन घेणार सिमरन
सिमरनने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ क्लिप देखील अपलोड केली आहे ज्यामध्ये एक मुलगी तिच्याशी खूप अपशब्दात बोलत आहे. सिमरन तिला तिचा चेहरा दाखवायला सांगते पण ती दाखवत नाही आणि संभाषणादरम्यान तिच्यासाठी खूप घाणेरडे शब्द वापरते. हा व्हिडिओ शेअर करत सिमरनने लिहिलं की, अशाप्रकारे चाहत्यांकडून मला शिवीगाळ, जीवे मारण्याच्या धमक्या आणि बलात्काराच्या धमक्या येत आहेत. त्यांची मुलं सोशल मीडियाच्या नावाखाली काय करतात हे त्यांच्या पालकांना कळायला हवं. यासोबतच या लोकांविरुद्ध सायबर क्राइममध्ये तक्रार नोंदवणार असल्याचंही सिमरनने सांगितलं आहे.