तयार व्हा कारण,2025 मधील 'हे' 4 हॉरर चित्रपट तोडतील सर्व हॉरर चित्रपटाचे रेकॉर्ड

New Upcoming Horror Comedy Movies: जर तुम्ही हॉरर कॉमेडी चित्रपटांचे चाहते असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण लवकरच काही भन्नाट हॉरर कॉमेडी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. हे चित्रपट तुम्हाला फक्त घाबरवणारच नाहीत, तर हसवून देखील सोडतील. जर तुम्ही या शैलीचे चाहते असाल, तर हे चित्रपट नक्कीच पाहा.  

Intern | Updated: Nov 30, 2024, 03:30 PM IST
तयार व्हा कारण,2025 मधील 'हे' 4 हॉरर चित्रपट तोडतील सर्व हॉरर चित्रपटाचे रेकॉर्ड title=

यावर्षी अनेक हॉरर कॉमेडी चित्रपट प्रदर्शित झाले, ज्यांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आणि प्रेक्षकांची मने जिंकली. या चित्रपटांनी 'स्त्री 2' आणि 'भूल भुलैया 3' यांसारख्या मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड तोडण्याची शक्यता आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणते नवीन हॉरर कॉमेडी सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.  

नवीन येणारे हॉरर कॉमेडी चित्रपट:  
2024 मध्ये अनेक हॉरर कॉमेडी चित्रपट प्रदर्शित झाले. ज्यांनी फक्त बॉक्स ऑफिसवरच नाही तर ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील प्रचंड धुमाकूळ घातला. यावर्षी 'स्त्री 2', 'भूल भुलैया 3', आणि 'मुंज्या' यांसारखे चित्रपट प्रेक्षकांसमोर आले, ज्यांनी कोटींची कमाई केली. पण हा प्रवास थांबलेला नाही. कारण 2025 मध्येही अनेक नवीन हॉरर कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.  

अक्षय कुमारचा 'भूत बंगला':  
अक्षय कुमारला शेवटचे 'भूल भुलैया' या हॉरर कॉमेडी चित्रपटात पाहिले गेले होते. त्यानंतर 'भूल भुलैया 2' मध्ये कार्तिक आर्यनने मुख्य भूमिका साकारली. आता अक्षय कुमारचा नवीन हॉरर कॉमेडी चित्रपट 'भूत बंगला' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात अक्षयसोबत वामीका गब्बी आणि परेश रावल हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट एक अनोखी कथा घेऊन येणार असून प्रेक्षक त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. अद्याप प्रदर्शनाची तारीख जाहीर झालेली नसली, तरी तो 2025 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.  

महाअक्षय चक्रवर्तीचा 'ओये भूतनी के':  
बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाअक्षय चक्रवर्तीला 2011 मध्ये 'हॉंटेड 3डी' या चित्रपटात पाहिले गेले होते. आता तो 'ओये भूतनी के' या नवीन हॉरर कॉमेडी चित्रपटासाठी सज्ज आहे. या चित्रपटात महाअक्षयसोबत निकिता शर्मा झळकणार आहे. हा चित्रपट 5 डिसेंबरला प्रदर्शित होईल आणि बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्याची तयारी करत आहे.

आयुष्मान खुराणाचा 'थामा':  
आयुष्मान खुराणा लवकरच थामा या हॉरर कॉमेडी चित्रपटातून या शैलीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत रश्मिका मंदाना आणि नवाजुद्दीन सिद्दीकीही दिसतील. सध्या हा चित्रपट प्री-प्रोडक्शनच्या टप्प्यात आहे आणि तो 2025 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. प्रेक्षक या चित्रपटाच्या मजेशीर आणि भितीदायक कथेसाठी खूप उत्सुक आहेत.  

प्रभासचा 'द राजा साब': 
मारुती यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला हा तेलुगू रोमँटिक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. ज्याचे प्रोडक्शन 'पीपल मीडिया फॅक्टरी'ने केले आहे. प्रभास मुख्य भूमिकेत असून निधी अग्रवाल आणि मालविका मोहनन (जिचा हा तेलुगू डेब्यू आहे) या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 10 एप्रिल 2025 रोजी प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना रोमांचक अनुभव देईल. प्रभासचा हा पहिलाच हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.