Siddharth Shukla Death Anniversary: बिग बॉसचा विजेता आणि टेलिव्हिजन अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये निधन झाले त्याला आता एक वर्ष पुर्ण झालं आहे. आजही त्याचे चाहते सोशल मीडियावर त्याच्या जाण्याबद्दल दु:ख व्यक्त करत आहेत. सिद्धार्थ शुक्ला याचे 2 सप्टेंबर 2021 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले. त्याच्या मृत्यूने केवळ त्याचे चाहते आणि कुटुंबीयच नव्हे तर त्याची सर्वात जवळची मैत्रीण शहनाज गिल या सगळ्यांनाच धक्का बसला होता.
सिद्धार्थ शुक्लाच्या निधनामुळे शहनाजला सर्वात मोठा धक्का बसला होता. परंतु या वर्षी सिद्धार्थच्या पहिल्या स्मृतीदिनी शहनाजनं कुठलीच पोस्ट टाकली नाही यावर तिच्या चाहत्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
शहनाज गिलने सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूच्या केवळ 13 दिवस आधी एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात सिद्धार्थ आणि शहनाजचं बॉन्डिंग दिसले होते. एका टीव्ही शोमध्ये ती सिद्धार्थसोबत दिसली होती. या व्हिडीओनंतर नियतीच्या मनात काही वेगळं असेल असे स्वप्नातही कोणाला वाटले नव्हते.
मीडिया रिपोर्टनुसार शहनाज गिल कधीही सोशल मीडियावर सिद्धार्थबद्दल काहीही पोस्ट करत नसल्याचे दिसून आले आहे. याचे कारण शहनाजसाठी सिद्धार्थ हा खूप खाजगी व्यक्ती आहे. तिला त्यांच्याबद्दल जाहीरपणे बोलायचे नाही. सिद्धार्थ शहनाजच्या आठवणीत आहे आणि कायम राहील. यावर शहनाज स्वत:ला अतिशय ठामपणे आहे. लोकांनी तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये गफलत करू नये अशी तिची इच्छा असल्याचं समोर आलं आहे.
सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर शहनाज गिलने 28 ऑक्टोबर 2021 रोजी पहिली पोस्ट शेअर केली. तू येही है हे गाणे शहनाजने फक्त आणि फक्त सिद्धार्थला समर्पित केले होते. तिनं 29 ऑक्टोबरला एका गाण्याची क्लिप शेअर केली आणि त्यानंतर 12 डिसेंबर 2021 रोजी सिद्धार्थबद्दलची शेवटची पोस्ट शेअर केली. यानंतर शहनाजने कधीही सिद्धार्थचा कोणताही फोटो किंवा पोस्ट शेअर केली नसल्याचं दिसून आलं आहे.