पहिल्याच दिवशी अर्जून-भूमीचा चित्रपट भूईसपाट! संपूर्ण देशात केवळ 500 लोकांनी पाहिला; Pan India कमाईचा आकडा फक्त...

The Lady Killer Box Office Collection Day 1 : द लेडी किलर चित्रपटानं पहिल्याच दिवशी केली इतकी कमाई की प्रेक्षकांनाही वाचून प्रेक्षकांना बसेल धक्का...

दिक्षा पाटील | Updated: Nov 4, 2023, 12:12 PM IST
पहिल्याच दिवशी अर्जून-भूमीचा चित्रपट भूईसपाट! संपूर्ण देशात केवळ 500 लोकांनी पाहिला; Pan India कमाईचा आकडा फक्त... title=
(Photo Credit : Social Media)

The Lady Killer Box Office Collection Day 1 : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि भूमि पेडनेकर या दोघांची जोडी ही आपल्याला ‘द लेडी किलर’ या चित्रपटात पाहायला मिळत आहे. हा चित्रपट काल प्रदर्शित झाला आहे. ‘द लेडी किलर’ ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हा पासून प्रेक्षक चित्रपटाची प्रतिक्षा करत होते. मात्र, थिएटर्समध्ये जेव्हा चित्रपट आला तेव्हा मात्र, तो पाहण्यासाठी कोणी पोहोचली नाही. पहिल्याच दिवशी चित्रपटानं इतकी खराब कमाई केली की सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. चला तर जाणून घेऊया 'द लेडी किलर'नं ओपनिंग डेला किती कमाई केली. 

‘द लेडी किलर’ मध्ये अर्जुन कपूर आणि भूमि पेडनेकर एकत्र दिसले नाही. चित्रपटाचा ओपनिंग गे चांगलं काम करू शकला नाही. तर आता ‘द लेडी किलर’ नं पहिल्या दिवशी किती कमाई केले त्याचे आकडे समोर आले आहेत. सैकनिल्कनं ट्वीटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. संपूर्ण देशात फक्त 293 तिकिट विकली गेलीत आणि तिनं फक्त 38 हजार रुपयांचे कलेक्शन केलं आहे. 

हेही वाचा : 'Popeye साठी मी...'; आमिरच्या लेकीनं केळवणामध्ये घेतला मराठीत उखाणा

दरम्यान, भूमी पेडनेकर आणि अर्जुन कपूर याची जोडी ही पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र, ‘द लेडी किलर’ या चित्रपटातून प्रेक्षकांना थिएटरमध्ये घेऊन येण्यास ते अपयशी ठरले आहेत. अशात आता हा चित्रपट जास्त काळ थिएटरमध्ये टिकून राहिल का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यासोबत अर्जुन कपूर आणि भूमि पेडनेकरचा हा चित्रपट डिजास्टर ठरला आहे. 

'द लेडी किलर' या चित्रपटात अर्जुन कपूर हा प्ले बॉयची भूमिका साकारत आहे. अर्जुन कपूरच्या आयुष्या एक मुलगी असून तिला तो कमिटेड असतो. तरी देखील तो दुसऱ्या मुलीच्या म्हजेच भूमि पेडनेकरच्या प्रेमात पडतो. पण ती सर्वसाधारण मुलगी नसते, ती कोण आहे त्याची एक वेगळीच कहानी आहे ज्याविषयी कोणाला काही माहित नाही, थोडक्यात ती एक मिस्ट्री आहे. त्याविषयी अर्जुनला थोडी देखील कल्पना नसते. अखेर तिच्याविषयीच सत्य जेव्हा अर्जुनच्या समोर येतं तेव्हा त्याला मोठा धक्का बसतो. ज्या मुलीवर अर्जुन प्रेम करतो तिचं महाराजासोबत अनैतिक संबंध आहेत हे अर्जुनला कळतं. या सगळ्या लव्ह मिस्ट्रीक एक मर्डर होतो. जो संपूर्ण गोष्टीला इंटेस बनवतो.