The Kerala Story box office Collection day 5: सध्या देशभरात एकाच चित्रपटाची चर्चा आहे आणि तो चित्रपट म्हणजे 'द केरळ स्टोरी'. 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाने प्रदर्शनाच्या एका आठवड्यात बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर इतका चांगला प्रतिसाद मिळेल याची कोणालाही अपेक्षा नव्हती. पण या चित्रपटानं प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी जी कमाई केली त्यानं सगळ्यांना धक्का बसला आहे. चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. चित्रपटानं इतक्यात 50 कोटींचा आकडा पार केला आहे.
'द केरला स्टोरी' या चित्रपटानं प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल 8.03 कोटी रुपयांच्या कलेक्शनसह जबरदस्त ओपनिंग केली होती. पुढे विकेंडविषयी बोलायचं झालं तर या चित्रपटानं शनिवारी 11.22 कोटी रुपये आणि रविवारी 16.40 कोटी रुपये कमावले. इतकंच नाही तर सोमवारी 'द केरला स्टोरी'ने देखील बॉक्स ऑफिसवर बाजी मारली आणि बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. पण विशेष म्हणजे पाचव्या दिवशी मंगळवारी या चित्रपटाच्या कलेक्शननं सर्वांनाच चकित केले आहे. या चित्रपटाने मंगळवारी जवळ जवळ 11.14 कोटींचे जबरदस्त कलेक्शन केले आहे. यामुळेच या चित्रपटाची एकूण कमाई 50 कोटींच्या पुढे गेली आहे. अत्यंत कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत एकूण 56.86 कोटींची कमाई केली आहे.
#TheKeralaStory continues its BLOCKBUSTER RUN… Hits HALF-CENTURY [₹ 50 cr]… Day 5 [Tue] is HIGHER than Day 4 [Mon] and Day 1 [Fri], SUPERB TRENDING… Fri 8.03 cr, Sat 11.22 cr, Sun 16.40 cr, Mon 10.07 cr, Tue 11.14 cr. Total: ₹ 56.86 cr. #India biz. #Boxoffice pic.twitter.com/2hcXS4LN9D
— taran adarsh (@taran_adarsh) May 10, 2023
या चित्रपटाचा विषय आणि कथा पाहता अगदी सुरुवातीपासूनच 'द केरला स्टोरी' या चित्रपटाची तुलना विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाशी होऊ लागली होती. मात्र आता 'द केरला स्टोरी' च्या कलेक्शनची घोडदौड पाहता हा चित्रपट कमाईच्या बाबतीत विवेक अग्निहोत्रीच्या चित्रपटाला देखील मागे पाडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा : 'आई कुठे काय करते' मालिकेत 'तारक मेहता...' फेम अभिनेत्रीची एंट्री?
द केरला स्टोरी वरून सर्वत्र चांगलाच वाद सुरु झाला आहे. या चित्रपटानं एका आठवड्याच्या आत 50 कोटींचा आकडा पार करणं खूप मोठी गोष्ट आहे. या चित्रपटाच्या स्टार कास्ट विषयी बोलायचे झाले तर अभिनेत्री अदा शर्मा, सिद्धि इडनानी, योगिता बिहानी आणि सोनिया बलानी या कलातकारांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. तर चित्रपटाची कहाणी ही 32 हजार नाही तर 4 मुलींवर आधारीत आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन हे सुदीप्तो सेन यांनी केलं आहे. तर चित्रपटाची निर्मिती विपुल अमृतलाल शाह यांनी केली आहे.