'आई कुठे काय करते' मालिकेत 'तारक मेहता...' फेम अभिनेत्रीची एंट्री?

Aai Kuthe Kay Karte या लोकप्रिय मराठमोळ्या मालिकेत तारक मेहता का उल्टा चष्मा फेम अभिनेत्री Khushboo Tawde ची एंट्री होणार आहे. या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मग आता खुशबूची एंट्री होताच मालिकेत काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

दिक्षा पाटील | Updated: May 10, 2023, 03:25 PM IST
'आई कुठे काय करते' मालिकेत  'तारक मेहता...' फेम अभिनेत्रीची एंट्री? title=
(Photo Credit : Social Media)

Aai Kuthe Kay Karte Khushboo Tawde : छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. मालिकेत आजवर अनेक ट्विस्टही आपण पाहिले. अरुंधतीच्या लग्नानंतर सगळं स्थिरावेल असं वाटतं असताना आता आशुतोषच्या बहिणीची मालिकेत एन्ट्री झाली आहे. त्यात सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे ती अनिरुद्धची बिझनेस पार्टनर बनून मालिकेत येणार आहे. ही भूमिका कोण साकारणार असा प्रश्न असेल तर ही भूमिका तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका फेम खूशबू तावडे साकारणार आहे. 

आता गोड दिसणारी ही खूशबू तावडे नकारात्मक भूमिका साकारणार का असा प्रश्न अनेकांना आला आहे. खुशबू साकारत असलेल्या या पात्राचं नाव वीणा असं आहे. खुशबूनं या आधी मेरे साई आणि आम्ही दोघी या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. आता तिला या मालिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. खुशबू ही गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. ते सोडता आता खुशबू आई कुठे काय करते या मालिकेत कशी भूमिका साकारणार आहे याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. तिची ही भूमिका जर निगेटिव्ह असेल तर खुशबू ती कशा प्रकारे साकारेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. इतकंच नाही तर याशिवाय वीणाच्या येण्यानं आशुतोष आणि अरुंधती यांच्या नात्यावर काय परिणाम होणार असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. खुशबू ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : ज्याच्यावर प्रेम केलं, त्यानंच पत्नीसमोर Zeenat Aman यांच्यावर उगारला हात; वाचून विश्वासच बसणार नाही

खुशबू विषयी बोलायचे झाले तर तिनं 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेत पत्रकार पोपटलालच्या पत्नीची भूमिका साकारली होती. खुशबूच्या पात्राचं नाव बुलबुल असं होतं. या मालिकेतील बुलबुलनं प्रेक्षकांना खिळवून ठेवलं असतं. याशिवाय खुशबू इतर अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये देखील दिसली होती.  खुशबूनं फक्त हिंदी नाही तर लोकप्रिय मराठी मालिकांमध्ये देखील दिसली होती. मराठी मालिकांमध्ये खुशबूनं 'देवयानी' मालिकेत दिसली होती. खुशबूच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचे झाले तर 'देवयानी' या मालिकेतील अभिनेता संग्राम समेळसोबत तिनं लग्नगाठ बांधली आहे. त्या दोघांना एक मुलगा आहे. तर तिची बहीण तितीक्षा तावडे ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. तितीक्षा ही झी मराठी या चॅनलवर असलेल्या  'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.