The Kerala Story Collection Day 2 : दुसऱ्या दिवशी द केरला स्टोरीच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये इतक्या कोटींची वाढ

The Kerala Story Box Office Collection day 2 : या चित्रपटानं पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनविषयी बोलायचं झालं तर चित्रपटाला सगळीकडून इतका विरोध होऊनही त्यानं इतकी कमाई केल्यानं सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: May 7, 2023, 02:53 PM IST
The Kerala Story Collection Day 2 : दुसऱ्या दिवशी द केरला स्टोरीच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये इतक्या कोटींची वाढ title=
(Photo Credit : Social Media)

The Kerala Story Box Office Collection day 2 : ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट 5 मे रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु होती. वादाच्या भोवऱ्यात हा चित्रपट तेव्हा पासून अडकला होता. चित्रपटात 32 हजार महिलांची कहाणी दाखवण्यात आल्याचा दावा हा खोटा आहे असे अनेक राजकीय पक्ष आणि धार्मिक संघटनांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी देखील केली होती. पण या चित्रपटातील ही कहाणी चार मुलींच्या आयुष्यावर आधारीत आहे. पण आता चित्रपट प्रदर्शित होऊन दोन दिवस झाले आहेत. चित्रपटानं दोन दिवसात बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली हे जाणून नक्कीच सगळ्यांना आश्चर्य होईल.  दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये 40-45 टक्क्यानं वाढ झाली आहे.

sacnilk नं दिलेल्या वृत्तानुसार, द केरला स्टोरी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 8.03 रुपयांचा गल्ला केला आहे. तर दुसऱ्या दिवशी चित्रपटानं 12.50 कोटींची कमाई केली. दोन दिवसात द केरला स्टोरीनं बॉक्स ऑफिसवर तब्बल 20.53 कोटींची कमाई केली. तर तमिळनाडूत हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आलेला नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'द केरला स्टोरी' विषयी सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरु झाली आहे. रविवारच्या शोसाठी म्हणजेच आजसाठी एडव्हांस बुकिंग देखील करण्यात आली आहे. तर त्याप्रमाणे आज चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमद्ये वाढ होणार असे म्हटले जात आहे. दरम्यान, दुसरीकडे सध्या थिएटरमध्ये दुसरे कोणते मोठे हिंदी चित्रपट उपलब्ध नाहीत. तर द केरला स्टोरी पाहण्यासाठी लोक गर्दी करत असून दुसरीकडे 'अफवाह' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि भूमि पेडनेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. दरम्यान, द केरला स्टोरीनं ओपनिंग डेच्या दिवशीच 'द कश्मीर फाइल्स', 'शहजादा' आणि  'सेल्फी' या चित्रपटांचा रेकॉर्ड पहिल्याच दिवशी मोडीत घातला आहे.  

हेही वाचा : 'दोन शब्द बोलू तरी शकली असतीस', हात मिळवायला नकार दिल्यानं Kareena Kapoor Khan ट्रोल

दरम्यान, या चित्रपटात अभिनेत्री अदा शर्मा, सोनिया बलानी, योगिता बिहानीला आणि सिद्धी इदनानीनं यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन हे सुदीप्तो सेन यांनी केले आहे. त्यांचे या आधी 'लखनऊ टाइम्स', 'द लास्ट मोन्क', 'आसमां' सारख्या चित्रपटांसाठी ओळखतात. 'द केरला स्टोरी' हा त्यांचा सगळ्यात मोठा असलेला चित्रपट आहे. तर द केरला स्टोरी चित्रपटाच्या शेवटी सगळे फॅक्ट्स दाखवण्यात आले आहेत.