'असताना तू' मधून उलगडणार 'मायलेकी'ची मैत्री

 'मायलेक' या चित्रपटाच्या टिझरनंतर या चित्रपटातील पहिलं जबरदस्त गाणं प्रदर्शित झालं असून यातून मायलेकींची मैत्री समोर येत आहे. 'असताना तू' असे या गाण्याचे बोल आहेत. 

Updated: Mar 20, 2024, 07:33 PM IST
'असताना तू' मधून उलगडणार 'मायलेकी'ची मैत्री title=

मुंबई : ब्लुमिंग लोटस प्रोडक्शन्स, सोनाली सराओगी प्रस्तुत प्रियांका तन्वर दिग्दर्शित 'मायलेक' या चित्रपटाची सध्या जोरदार  चर्चा सुरु आहे. कारण… या चित्रपटात झळकणाऱ्या खऱ्या मायलेकी. टिझरमधून आपण त्यांची सुंदर केमिस्ट्री पाहिली. आता टिझरनंतर या चित्रपटातील पहिले जबरदस्त गाणे प्रदर्शित झाले असून यातून मायलेकींची मैत्री समोर येत आहे. 'असताना तू' असे या गाण्याचे बोल आहेत. हे सुरेख आणि हॅपनिंग गाणे पंकज पडघन यांनी गायले असून त्याला सावनी भट यांची साथ लाभली आहे. पंकज पडघन यांचेच अफलातून संगीत याला लाभले आहे. तर क्षितिज पटवर्धन यांनी हे गाणे शब्दबद्ध केले आहे. 

या गाण्यातून आई आणि मुलीच्या नात्यातील बॅाण्डिंग दिसत आहे. प्रत्येक चांगल्या वाईट परिस्थितीत आपण एकमेकांसोबत आहोत, असा या गाण्याचा सार आहे. चित्रपटात सोनाली खरे, सनाया आनंद, उमेश कामत, बिजय आनंद, शुभांगी लाटकर, संजय मोने यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर कल्पिता खरे, बिजय आनंद या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. नितीन प्रकाश वैद्य या चित्रपटाचे असोसिएट प्रोड्यूसर आहेत. या आई आणि लेकीची सुंदर केमिस्ट्री १९ एप्रिलला चित्रपट पाहिल्यावरच कळेल.

या गाण्याबद्दल सोनाली खरे म्हणते, '' अगदी खरं सांगायचे तर माझ्या आणि मायरावर चित्रित करण्यात आलेले  हे गाणे आम्हा दोघींना अगदी तंतोतंत जुळते. आमचे प्रत्यक्षात असेच गोड नाते आहे. कदाचित त्यामुळेच आमच्यातील ही केमिस्ट्री पडद्यावर नैसर्गिक दिसत असावी. गाणे रॉकिंग असल्याने रेकॉर्डिंगलाही प्रचंड धमाल आली. मुळात गाण्याची टीम अतिशय हॅपनिंग आहे. आई आणि मुलीमधील सुंदर नाते उलगडणारे हे गाणे आहे.''

या सिनेमाबद्दल दिग्दर्शिका प्रियांका तन्वर म्हणतात, '' आई आणि मुलीचे नाते अधोरेखित करणारा हा चित्रपट आहे. यात धमाल, मजामस्ती, हसू आणि आसू, दुरावा अशा एखाद्या नात्यातील सगळ्या भावना आहेत. मुळात आई आणि मुलीचे नाते खूप नाजूक असते. या चित्रपटाची खासियत म्हणजे यात खऱ्या मायलेकी असल्याने त्यांच्यातील नैसर्गिक केमिस्ट्री पडद्यावर दाखवणे मला अधिकच सोप्पे झाले. सोनाली एक उत्तम अभिनेत्री आहेच. तिचा हा गुण सनायामध्येही आला आहे. तिचा हा पहिला चित्रपट आहे, असे कुठेही जाणवत नाही. हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासाठी आहे, परंतु प्रत्येक आईमुलीने हा चित्रपट आवर्जून पाहावा.''

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x