मुंबई : सोफिया हयात बऱ्याच बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसली आहे. याशिवाय सोफिया तिच्या वक्तव्यांमुळे आणि बोल्ड व्हिडिओंमुळे देखील अनेकदा चर्चेत आली आहे. अचानक करिअरमधून एक्झिट घेऊन तिने सर्वांनाच चकित केलं होतं. आता पुन्हा एकदा ती तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.
बोल्ड वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत
टीव्ही रिअॅलिटी शो 'बिग बॉस 7' मधून प्रसिद्ध झालेली सोफिया हयात केवळ तिच्या खळबळजनक फोटोंमुळेच नाही तर वादग्रस्त वक्तव्यांमुळेही चर्चेत असते. मागच्या वेळी सोफिया हयातने सलमान खान आणि करण जोहरसारख्या सेलिब्रिटींवर अनेक आरोप केले होते. आता ती तिच्या एका बोल्ड वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.
पॉर्न बघणारे करु शकत नाही किस
खरं तर, सोफिया हयातने 'फिल्मबीट'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, पुरुषांना किस कसं घ्यावं हे माहित नसतं कारण ते खूप पॉर्न पाहतात. तिचा वैयक्तिक अनुभव सांगताना सोफिया म्हणाली, 'मी 18 वर्षांची असताना शाळेत एका मुलाला किस केलं होतं. त्याने माझ्या डोळ्यात पाहिलं आणि तो माझ्या जवळ आला. मी काय करत आहे याची मला कल्पना नव्हती पण त्याला माहित होतं. मला आठवतंय मला ते आवडलं नाही. तो खूप घाणेरडा होता.
सोफिया हयातने एका या मुलाखतीत सांगितलं होतं की, तिला किस करायला आवडत नाही. सोफिया म्हणाली, 'जर एखाद्या पुरुषाने मनातील वासनेने तुम्हाला किस केलं, तर ते पूर्णपणे बकवास किस असेल. महिलांना पुरुषांपेक्षा जास्त ऊर्जा वाटते. जेव्हा माणूस किस घेण्यास उत्सुक असतो तेव्हा आपल्याला कळतं. जर एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीला क्वीन असल्यासारखं किस केलं तर ती स्त्री क्वीनसारखी फिल करु लागते.