ड्रग्स प्रकरणानंतर आर्यन खानचं IPL सोबत का जोडलं जातय नाव?

ऑक्शन दरम्यानचे आर्यनचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल   

Updated: Feb 12, 2022, 03:02 PM IST
ड्रग्स प्रकरणानंतर आर्यन खानचं IPL सोबत का जोडलं जातय नाव?  title=

मुंबई : आयपीएल 2022 मेगा लिलाव सुरू झाला आहे. ज्याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलं आहे. मेगा ऑक्शनसाठी सर्व संघांचे मालक, मार्गदर्शक आणि प्रशिक्षक बेंगळुरू येथे उपस्थित आहेत. कोलकाता नाईट रायडर्सचा मालक शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि मुलगी सुहाना खान देखील याठिकाणी उपस्थित आहेत. मेगा लिलाव सुरू होण्याच्या अगदी एक दिवस आधी ब्रिफिंगमध्ये दोघांनी हजेरी लावली. 

कोलकाता नाईट रायडर्सच्या बाजूने CEO वेंकी मैसूरसोबत सुहाना आणि आर्यन एका टेबलवर बसलेले दिसत आहेत. ब्रिफिंग दरम्यान आर्यन मैसूरसोबत काही बोलताना दिसत आहेत. 

सध्या सोशल मीडियावर सुहाना आणि आर्यनचे ऑक्शन दरम्यानचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. ऑक्शनदरम्यान सुहाना आणि आर्यनसोबतचं  संघात कोण-कोण सामील होईल, हा चर्चेचा विषय आहे.

संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी श्रेयस अय्यरच्या खांद्यावर येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  पॅट कमिन्स पुन्हा एकदा केकेआरच्या संघात सामील झाला. कमिन्सला KKR ने 7.25 कोटींना विकत घेतले.

दरम्यान, आर्यन बद्दल सांगायचं झालं तर ड्रग्स प्रकरणातून सुटल्यानंतर तो पहिल्यांदा कार्यक्रमात दिसला आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे