स्वत:च्या पायावर उभं राहता येईना, व्हीलचेअरवर काढले दिवस; सोडली जगण्याची आशा अन् आज....; 52 वर्षीय अभिनेत्रीने सांगितला अनुभव

प्रसिद्ध अभिनेत्री तनाज ईरानी हिने नुकत्याच एका मुलाखतीत आरोग्याशी संबंधित समस्यांना तोंड देत होती.  स्वत:च्या पायांवर उभंसुद्धा राहता येत नव्हतं. तिला व्हीलचेअरची मदत घ्यावी लागली, असा खुलासा तिने केला आहे. 

Updated: Dec 31, 2024, 04:37 PM IST
स्वत:च्या पायावर उभं राहता येईना, व्हीलचेअरवर काढले दिवस; सोडली जगण्याची आशा अन् आज....; 52 वर्षीय अभिनेत्रीने सांगितला अनुभव title=
(photo credit - social media)

'कहो ना प्यार है' या चित्रपटातून डेब्यू करणारी तसेच बिग बॉस शो मधून प्रसिद्धी मिळवलेली तनाज ईरानी आपल्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. या मुलाखतीत तिने आपल्या वाईट काळातील अनुभवांबद्दल सांगितले. तनाज ही आरोग्याशी संबंधित समस्यांना तोंड देत होती. अनेक कठीण आव्हानांना तिला सामोरं जावं लागलं होतं, असं तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. तनाजला स्वत:च्या पायांवर उभंसुद्धा राहता येत नव्हतं. तिला व्हीलचेअरची मदत घ्यावी लागली, असा खुलासा तिने केला आहे. 

"2021 मध्ये मला चालताना अडचणी येत होत्या तसंच माझं वजन सुद्धा खूप वाढलं होतं." असं तनाज मुलाखतीत म्हणाली. तनाजने पहिल्यांदाच तिच्या या आरोग्याशी संबंधित अडचणीविषयी सांगितलं. तिच्या या पायाच्या समस्येमुळे तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ती स्वत:चा पाय सुद्धा उचलू शकत नव्हती, असंही तिने या मुलाखतीत सांगितलं.

हे ही वाचा: राजघराण्यात जन्मलेल्या 'या' अभिनेत्रीने आईमुळे दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता...

एका पॉडकास्ट मध्ये दिलेल्या इंटरव्ह्यू मध्ये तनाज ईरानीने सांगितलं की, " 2021 पासूनच मला चालताना अडचणी येत होत्या. मला वाटले की पायात पॅचमुळे असे होत असेल. यादरम्यान माझं वजन सुद्धा वाढलं होतं त्यामुळे कदाचित चालताना अडचणी येत असतील असं मला वाटलं." यामधून ती बाहेर पडू शकत नव्हती कारण पायाचा हा आजार बराच होत नव्हता, असं तिच्या मुलाखतीतून समजत आहे. 

तनाज ईरानीने MMA जॉइन केलं होतं. यामुळे आजार हा अधिक गंभीर स्वरुपाचा झाला. यानंतर तिने पाठीशी संबंधित सर्व चाचण्या केल्या. या चाचण्यांमधुन पाठीच्या कण्यामध्ये समस्या असल्याचं समोर आलं. 3 महिन्यांपर्यंत या आजारावर उपचार सुरू होते. या उपचारानंतर आजार बरा होण्यास मदत तर झाली, मात्र यानंतरही वजन कमी न झाल्याने तिला व्यवस्थित चालता येत नव्हतं. असं सर्व तिने त्या मुलाखतीत सांगितलं. 

तनाज ईरानीच्या आरोग्यासंबंधी समस्यांमध्ये आणखी भर पडत होती. तिला बऱ्याच चाचण्या करुन सुद्धा पाहिजे तसा फरक तिला जाणवतच नव्हता. गुडघ्यात आणि पाठीमध्ये वारंवार समस्या उद्भवत असल्या कारणाने नंतर तिला डॉक्टरांनी MRA करण्याचा सल्ला दिला. तनाजला या अवस्थेमुळे अखेर व्हीलचेअरचा वापर करावा लागला. ती स्वत:च्या पायांवर उभी राहू शकत नव्हती. यामुळे तीचं बाहेर येणं जाणं सुद्धा थांबलं. 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Tannaz Irani (@tannazirani_)

शेवटी 52 वर्षीय या अभिनेत्रीच्या हीपची सर्जरी झाली. सर्जरी नंतर जेव्हा तनाज स्वत:च्या पायावर उभी राहिली तेव्हा ती हुंदका आवरु शकली नाही. इतक्या काळानंतर उभी राहिल्यावर तिला एक पाय छोटा आणि एक मोठा असल्याचं जाणवलं. त्यावेळी तिला जगण्याची इच्छा नसल्याची ती सांगत होती. 

या मोठ्या धक्क्यातून तनाज आता सावरली आहे. आधी पेक्षा जास्त उत्साह आता तिच्यात दिसतो. सोशल मिडीयावर बरेचसे व्हिडीओ बनवून शेअर करते. तिचा हा प्रवास बऱ्याचजणांना प्रेरणा देणारा ठरला आहे.