Indian Railways New Rules: भारतीय रेल्वेने प्रवाशांची सुरक्षितता आणि सेवेसाठी एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. आता ट्रेनच्या एसी कोचमध्ये वापरण्यात येणाऱ्या चादरी आणि उशांची अभ्रक यांच्या स्वच्छतेसाठी विशेष लक्ष देण्यात येणार आहे. त्याव्यतिरिक्त ब्लँकेटची स्वच्छतादेखील आता दर 15 दिवसांनी केली जाणार आहे. रेल्वेकडून या निर्णयावर सध्या काम सुरू आहे.
रेल्वे मंत्रालयाने या निर्णयाची अंमलबजावणीसाठी गुवाहाटीच्या रेल्वे लाँड्रीत काम सुरू केले आहे. स्वच्छतेच्या बाबतीत प्रवाशांना आता चांगला अनुभव मिळणे अपेक्षित आहे. गुवाहाटीतील रेल्वे लॉन्ड्रीमध्ये ब्लँकेट आणि चादरी धुण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. गुवाहाटी रेल्वेचे वरिष्ठ इंजिनिअर नीपन कलिता यांनी दिलेल्या माहितीनुसार ब्लँकेटच्या स्वच्छतेची प्रक्रिया वेगवान आणि प्रभावी आहे. एक ब्लँकेट साफ करण्यासाठी साधारण 45 मिनिटांचा वेळ लागतो. ब्लँकेट धुण्याची प्रक्रिया आधी चार भागांमध्ये विभागली जाते. ब्लँकेट 80 ते 90 डिग्री तापमानावर धुतले जाते. त्यानंतर ड्रायरमध्ये सुकवण्यात येते. कधी कधी या प्रक्रियेत अधिक वेळ देखील लागू शकतो. मात्र, एक ब्लँकेट साफ करण्यासाठी 50 ते 55 मिनिटांपर्यंतचा वेळ लागू शकतो.
गुवाहाटी कोचिंग डेपोचे मॅनेजर सुदर्शन भारद्वाज यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेतील चादरी दररोज धुतल्या जातात. यासाठी साधारण 45 ते 60 मिनिटांचा वेळ लागतो. बेडशीट मशीनमध्ये टाकून धुतल्या जातात आणि पुन्हा त्या वॉश, ड्राय आणि स्टीम आयर्नच्या पद्धतीचे साफ केल्या जातात. या संपूर्ण प्रक्रियेला जवळपास 45 ते 60 मिनिटांचा वेळ लागतो. एक ब्लँकेट 973 वजनाचे असते यात जवळपास 23.59 रुपयांचा खर्च असतो. यात जीएसटीदेखील सहभागी आहे. याचपद्धतीने बेड रोलला पूर्णपणे साफ करण्यासाठी 23.58 रुपयांचा खर्च येतो.
60 टक्के महिलाच काम करतात
या रेल्वे लाँडीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये 60 टक्के महिला काम करतात. प्रवाशांच्या वाढत्या तक्रारी पाहता रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. ब्लँकेट अनेकदा अस्वच्छ आणि व्यवस्थित धुतल्या जात नसल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या होत्या. संसदेतदेखील यावर प्रश्न उपस्थित केला होता.