श्रद्धा कपूर-राजकुमार राव यांच्या 'स्त्री 3' चित्रपटाची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी होणार प्रदर्शित

श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या 'स्त्री 2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. अशातच ही जोडी आता 'स्त्री 3' चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Jan 3, 2025, 01:35 PM IST
श्रद्धा कपूर-राजकुमार राव यांच्या 'स्त्री 3' चित्रपटाची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी होणार प्रदर्शित  title=

Stree 3 Release Date Out: राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या 'स्त्री 2' चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. 'स्त्री 2' हा चित्रपट 2024 मधील ब्लॉकबस्टर चित्रपट आहे. या हॉरर आणि कॉमेडी  चित्रपटाला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं. त्यासोबतच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करून अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले. 

दरम्यान, 'स्त्री 2' चित्रपटाच्या निर्मात्यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. ज्यामध्ये त्यांनी  'स्त्री 3' चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. चला तर मग जाणून घेऊयात 'स्त्री 3' चित्रपट थिएटरमध्ये कधी प्रदर्शित होणार? 

'स्त्री 3' चित्रपट कधी प्रदर्शित होणार? 

'स्त्री 2' चित्रपटाच्या यशानंतर निर्मात्यांनी या हॉरर-कॉमेडी चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची रिलीज डेट जाहीर केली आहे. अभिनेता राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांची जोडी 'स्त्री 3' मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार असून अमर कौशिक दिग्दर्शित करणार आहेत. 'स्त्री 3' हा चित्रपट 2027 मध्ये रिलीज होणार आहे. मॅडॉक फिल्म्सने केलेल्या घोषणेनुसार, 'स्त्री 3' हा चित्रपट 2027 मध्ये 13 ऑगस्ट रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

याचबरोबर मॅडॉक सुपरनॅचरल युनिव्हर्सच्या अधिकृत निर्मिती स्टुडिओने 'शक्ती शालिनी', 'भेडिया 2' आणि 'चामुंडा' यासह अनेक बहुप्रतिक्षित चित्रपटांच्या रिलीज तारखा देखील जाहीर केल्या आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

'स्त्री 2' चे बॉक्स ऑफिस कलेक्शन

'स्त्री 2' हा चित्रपट आत्तापर्यंत सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाने भारतात 591.95 कोटी रुपयांची कमाई केली. तर जगभरात या चित्रपटाने 840.10 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटात अक्षय कुमारने कॅमिओ केला आहे. त्यानंतर, अक्षय कुमार आगामी 'स्त्री 3'मध्येही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती समोर येत आहे. या हॉरर-कॉमेडी फ्रँचायझीमध्ये पुढे काय होणार याची चाहत्यांना आता उत्सुकता आहे.