मुंबई : तनाज इराणी ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने केवळ बॉलिवूड चित्रपटांमध्येच आपली प्रतिभा दाखवली नाही, तर छोट्या पडद्यावरही तिने दबदबा निर्माण केला आहे. 'कहो ना प्यार है', 'मैं प्रेम की दिवानी हूं', 'टाइम पास', 'रेहना है तेरे दिल में', 'हद कर दी आपने', 'कुछ ना कहो', 'मेरे यार' 'की शादी है', 'हमारा दिल आपके पास है', 'मिलेंगे मिलेंगे' अशा अनेक मोठ्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत ही अभिनेत्री दिसली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, ती बऱ्याच काळापासून पडद्यावर दिसलेली नाही.
जर तुम्ही तिचा आत्ताा लूक पाहिला तर तुम्हाला समजेल की, अभिनेत्री तानाज इराणीचा लूक खूप बदलला आहे. तिला दोन मुलं आहेत. तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर खूप पाहायला मिळतात. कधी ती तिच्या मैत्रिणींसोबत पूलसाइड एन्जॉय करताना दिसते. तर कधी ती तिच्या पतीसोबत सेल्फी घेताना दिसते. तनाज सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या प्रत्येक नवीन अपडेट्स चाहत्यांसोबत नेहमी शेअर करते. त्याचबरोबर, चाहते देखील तिच्या नवीन अपडेट्सची प्रतीक्षा करत असतात.
तानाज इराणी तिच्या बबली स्टाइलसाठी चांगलीच पसंत केली जाते. तनाज केवळ चित्रपटच नाही तर टेलिव्हिजनमध्येही एक प्रसिद्ध कलाकार आहे. 2007 मध्ये तिने टीव्ही अभिनेता बख्तियार इराणीशी लग्न केलं. दूरदर्शनच्या लोकप्रिय मालिका जबान संभाल के मध्येही ती जेनिफरच्या भूमिकेत दिसली होती.