तैमुरच्या लंडनमधील धमालमस्तीचे व्हिडिओ व्हायरल

तैमुर अली खान या अवघ्या दीड वर्षाच्या स्टारकिडने इंटरनेटला वेड लावलं आहे. 

Updated: Jul 3, 2018, 07:55 PM IST
तैमुरच्या लंडनमधील धमालमस्तीचे व्हिडिओ व्हायरल  title=

मुंबई :तैमुर अली खान या अवघ्या दीड वर्षाच्या स्टारकिडने इंटरनेटला वेड लावलं आहे. तैमुरचा प्रत्येक नवा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो. त्याच्या निरागस चेहर्‍याचे अनेक चाहते आहेत. त्यामुळे तैमुर कुठे आहे? काय करतोय? याच्या प्रत्येक अपडेटवर तैमुरचे चाहते लक्ष ठेवून असतात.  

लंडनमध्ये तैमुर 

तैमुर काही दिवसांपूर्वी करिना अअणि सैफ अली खानसोबत लंडना गेला होता. लंडनमध्ये तैमुरने केलेल्या धमालमस्तीचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले आहेत. लंडनमध्ये रोडिज फेम रणविजय सिंह याच्या मुलीसोबत एक लहानशा सी-सॉवर तैमुर खेळताना दिसला. 

 

तैमुर अली खान करिना आणि तिच्या मैत्रिणीसोबत बबल गनसोबत खेळताना दिसला. करिष्मा कपूरच्या बर्थ डे पार्टीमध्येही तैमुर धम्मल करताना दिसला आहे.