Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Jennifer Mistry Bansiwal : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका जवळपास 15 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेचे लाखो चाहते आहेत. या मालिकेतील प्रत्येकातील कलाकारांचेही लाखो चाहते आहेत. आता मालिकेत टप्पू आणि सोनूची लव्ह स्टोरी दाखवण्यात येत आहे. त्यावरून जेठालाल आणि भिडे एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. दरम्यान, या मालिकेत रोशन सिंग सोढीच्या पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बंसावीलनं मालिकेला रामराम केला आहे. इतकंच नाही तर तिनं मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांच्यावर गंभीर आरोप देखील केले आहेत.
ईटाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, जेनिफरमिस्त्री बंसीवालनं दोन महिन्यांपूर्वीच मालिकेसाठी शूट करणं बंद केलं आहे. तिनं असं देखील सांगितलं तिचा शूटिंगचा शेवटचा दिवस हा 6 मार्च होता. मालिकेच्या सेटवर प्रोजेक्ट हेड सोहेल आणि कार्यकारी निर्माता जतिन बजाज यांनी तिचा अपमान केला. ही माहिती मिळाल्यानंतर ईटाइम्सनं जेनिफरशी संपर्क साधला आणि त्यावर प्रतिक्रिया देत जेनिफर म्हणाली, 'हो, मी मालिका सोडली. मी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेसाठी माझं शेवटचं शूट हे 6 मार्च रोजी केलं होते. मला सेटवरून जायचं होतं. तर त्याचवेळी सोहेल आणि मालिकेचे कार्यकारी निर्माता जतिन बजाज यांनी अपमान केला.'
तिच्या शेवटच्या दिवसाविषयी थेट स्पष्ट विचारणयात येताच जेनिफर म्हणाली, '7 मार्च रोजी माझ्या लग्नाची अॅनिव्हर्सरी आणि होळी होती. मला सोहेल आणि जतिन यांनी चार वेळा सेडवरून जाण्यास सांगितले. मागे उभं राहून माझ्या गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि मला सेटवरून बाहेर जाऊ दिले नाही. मी त्याला सांगितलं की मी मालिकेच 15 वर्षे काम केलं आहे आणि मला जबरदस्ती करून थांबवू शकत नाही आणि जेव्हा मी जाऊ लागले तेव्हा त्यानं मला धमकी दिली. त्यानंतर मी असित कुमार मोदी, सोहेल रमानी आणि जतिन बजाज यांच्या विरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली.'
हेही वाचा : The Kerala Story चित्रपटानं 6 दिवसात पार केला 60 कोटींता आकडा! 'या' चित्रपटांना टाकलं मागे
होळीच्या सुट्टीविषयी बोलताना जेनिफर म्हणाली, 'मी त्यांच्याकडे हाफ डे मागितला होता आणि म्हटलं ते नसेल तर मला दोन तासासाठी घरी जाऊ द्या कारण माझी मुलगी घरी वाट पाहत आहे. त्यांनी सगळ्यांसोबत एडजेस्टमेंट केली पण माझ्यासोबत नाही. मला ही जाणीव झाली की ही जागा महिलांसाठी काम करण्यासाठी योग्य नाही. प्रोजेक्ट मॅनेजरनं मला सगळ्यांसमोर चार वेळा गेट आऊट म्हटलं आणि खूप वाईट पद्धतीनं माझ्याशी बोलला. क्रिएटिव्ह पर्सननं माझी गाडी थांबवली आणि हे सगळं सीसीटीव्हीत कैद झालं आहे. हे सगळं 7 मार्च रोजी झालं होतं. मला वाटलं की हे लोक मला कॉल करतील पण असं झालं नाही. पण 24 मार्च रोजी त्यांनी मला नोटीस पाठवली की मी शूट सोडून निघून गेले आणि त्यामुळे त्यांचे नुकसान होत आहे. हे उल्टा चोर कोतवाल को डांटे असं आहे. त्यांना मला घाबरवायचं होतं. 4 एप्रिल रोजी मी त्यांना व्हॉटसअॅपवर रिप्लाय देत सांगितले की हे सगळं लैंगिक शोषण आहे. तर त्यावर उत्तर देत माझ्यावर आरोप करत म्हटले की मी त्यांच्याकडून पैसे काढूण घेण्यासाठी हे सगळं करत आहे. त्याच दिवशी मी ठरवलं की मी त्यांच्याकडून पब्लिकली माफी मागून राहिनं. याआधी देखील असं बऱ्याचवेळा झालं आहे. पण मी त्याकडे दुर्लक्ष करत राहिले.'