Taarak Mehta : रिटा रिपोर्टने व्हिडीओ शेअर करत लग्नाच्या आठवणींना दिला उजाळा

तारक मेहताच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने लग्नाचा 'तो' व्हिडीओ केला शेअर

Updated: Jul 21, 2022, 01:35 PM IST
Taarak Mehta : रिटा रिपोर्टने व्हिडीओ शेअर करत लग्नाच्या आठवणींना दिला उजाळा title=

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकारा हा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. मालिकेत रिटा रिपोर्टची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रिया आहुजाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत प्रियाने तिच्या लग्नाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

'तारक मेहता...' या मालिकेतील रीटा रिपोर्टची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रिया आहुजाने गेल्या वर्षी दुसऱ्यांदा लग्न केले होते. प्रियाने 'तारक मेहता...' मालिकेतील दिग्दर्शक पती मालवा राजदा यांच्यासोबतचं लग्न केले होते. गेल्या वर्षी १९ नोव्हेंबर रोजी प्रिया आणि मालव राजदा यांच्या लग्नाला १० वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने त्यांनी लग्न केलं होतं. तिच्या लग्नाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी प्रियाने हा व्हिडीओ शेअर केला आहे.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

प्रियाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओ प्रियाच्या भांगेत पती मालवा राजदा सिंदुर भरताना दिसत आहेत. त्यांच्या लग्नात 'तारक मेहता…'च्या टीमने हजेरी लावली होती.

आधी ते चांगले मित्र होते आणि नंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर १९ नोव्हेंबर २०११ साली प्रियाने मालवा राजदा यांच्याशी लग्न केलं. त्यांचा तीन वर्षांचा मुलगा आहे. दरम्यान, लग्नाच्या ८ वर्षांनंतर म्हणजेच २७ नोव्हेंबर २०१९ मध्ये प्रियाने तिच्या मुलाला जन्म दिला. त्यांच्या रिलेशनशिपची सुरुवात तारक मेहताच्या सेटवर झाली होती.