​१० व्या बॉयफ्रेंडशी सुष्मिता सेनचा ब्रेकअप !

कधी हो तर कधी नाही अशात अखेर बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने आपल्या शेवटच्या बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप केला आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Nov 24, 2017, 06:50 PM IST
​१० व्या बॉयफ्रेंडशी सुष्मिता सेनचा ब्रेकअप ! title=

मुंबई : कधी हो तर कधी नाही अशात अखेर बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने आपल्या शेवटच्या बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप केला आहे. 

सुष्मिता खूप काळ रिलेशनशिप असलेला रितिक भसीन हा बॉयफ्रेंड आहे. हे दोघे गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहे. एवढ्या कमी वेळात या दोघांचं नातं तुटलं. याचं नेमकं काय कारण असू शकेल अशी चर्चा सुरू आहे. बॉलिवूड लाईफच्या माहितीनुसार सुष्मिता सेनसोबत असलेल्या एका सूत्राने सांगितले की, सुष्मिता आणि रितिकचे ब्रेकअप झाले आहे. आता ते दोघेही सिंगल आहेत. या नात्यानंतरही सुष्मिता नव्या नात्यासाठी सज्ज आहे. म्हणजे अजूनही तिला प्रेम होण्याची दाट शक्यता आहे. 

हे आहेत सुष्मिताचे सुरूवातीचे बॉयफ्रेंड 

सुष्मिता सेन या अगोदरही अनेकांना डेट करून झाली आहे. कुणासोबतही तिचं लाँग रिलेशनशिप राहिलेलं नाही. विक्रम भट्ट, रणदीप हुड्डा, वसीम अकरम, मुदस्सर अजीज, इमतियाज खत्री, मानव मेनन, संजय नारंग, सबीर भाटिया, बंटी सचदेवा यांच्यासोबत देखील तिचं अफेअर सुरू होतं. 

कोण आहे रितिक भसीन? 

रितिक भसीन अनेक नाईटक्लबचे मालक आहेत. अर्जून कपूर, अभिषेक कपूर, समीर दत्तानी, श्र्वेता साल्वेसोबत बी टाऊनचे अनेक सेलिब्रिटिज त्यांचे मित्र आहेत. त्याची एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे. 

सुष्मिता सेन कायम आपल्या सिनेमांसोबतच एटिट्यूड आणि खुल्या विचारांसाठी लोकप्रिय आहे. सुष्मिता कधीच आपल्या लव-लाईफवर पडदा टाकण्याचा विचार करत नाही. एका मुलाखतीत तिने सांगितलं होतं की, मला लग्न करायचं आहे. १६ वर्षाची असल्यापासून मला लग्न या गोष्टीचं कुतूहल आहे. मात्र मला या गोष्टीत घाई करायची नाही. मला योग्य वेळीच लग्न करायचं आहे.