शारिरीक संबंध, पैशांचा व्यवहार अन् 25 महिलांना... , पुण्यातील 'लखोबा लोखंडे'ची मोडस ऑपरेंडी

Pune News Today: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने 25 हून अधिक महिलांची फसवणूक केली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 14, 2025, 11:03 AM IST
शारिरीक संबंध, पैशांचा व्यवहार अन् 25 महिलांना... , पुण्यातील 'लखोबा लोखंडे'ची मोडस ऑपरेंडी title=
25 young women cheated by a young man from Pune

Pune News Today: एकीकडे लग्नाळू तरुणांची संख्या वाढत असताना पुण्यातील एका लाखोबा लोखंडेने तब्बल 25 हुन अधिक महिलांची फसवणूक करुन त्यांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. या तरुणाने या महिलांकडून मोठया प्रमाणात पैसे लुटले असल्याचे देखील उघड झाले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. 

फिरोज निजाम शेख असं या ठकसेन तरुणाचे नाव असून एका वेबसाईटच्या माध्यमातून अनेक महिलांना लग्न करण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळायचा. हा ठकसेन तरुण पुण्यातील कोंढवा इथला राहिवाशी असून त्याचे लग्न देखील झाले आहे. इतकंच नव्हे तर त्याला मुलेदेखील आहेत. मुलींना फसवण्यासाठी तो एका वेबसाइटचा वापर करायचा.

आरोपी तरुणाने एका वेबसाईडच्या माध्यमातून कोल्हापुरातील एका महिलेला गाठलं तिच्याशी जवळीक साधत तिच्या बरोबर शारीरिक संबंध प्रस्तापित केले. त्यांनतर मी कॉन्ट्रॅक्टर असल्याचे सांगून व्यवसायासाठी या महिलेकडून वेळोवेळी 69 हजार रुपये आणि 8 लाख रुपयाचे दागिने उकळले. पण तो इतक्यावरच थांबला नाही तर त्याने आजारी असल्याचे फसवणूक करण्यास सुरुवात केली. 

मला ब्रेन ट्यूमर झाला असल्याची बतावणी करत त्यांनी महिलेला फसवायला सुरुवात केली. त्यामुळं त्या महिलेने या लाखोबा लोखंडे विरोधात कोल्हापूर पोलिसात गुन्हा दाखल केला. त्यांनतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुण्यातून या ठकसेनाला बेड्या ठोकल्या आहेत. या ठकसेनने अनेक महिलांना लग्नाचे अमिष दाखवून लुटले असल्याचे तपासात उघड झाले आहे. आतापर्यंत याने 25 जणांची फसवणूक केल्याची माहिती समोर येत आहे. 

भोंदू बाबाने महिलेला घातला पाऊणे नऊ लाखांचा गंडा

अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात आला असला तरी सुद्धा आजही भोंदू बाबांकडून भोळ्या भाबड्या नागरिकांची फसवणूक करण्याचे गुन्हे घडतायत. अंधश्रद्धेने अनेकांना गंडा घालत असल्या बाबतच्या घटना आपल्या आजूबाजूला सतत घडत असतात. अशा घटना विनाशाचे कारण ठरल्या असून अनेकांची यातून फसवणूक देखील झाल्याची उदाहरणे सातत्याने घडतच आहेत. पैसा, सुबत्ता आणि आरोग्यासाठी काही जण भोंदूबाबांच्या प्रलोभनांना बळी पडत आहेत. अशीच घटना भिवंडीतील एका महिलेसोबत घडली आहे. पतीचे आजारपण तसेच मुलांवरील काळी जादू उतरवण्यासाठी मृतदेहाची पूजा करायची आहे असं सांगून महिले कडून ८ लाख ८७ हजार उकळण्याचा प्रकार भिवंडीतून समोर आला आहे. भिवंडीतील मिल्लतनगरमध्ये राहणारी ४६ वर्षीय अख्तर अलीम अन्सारी अस फसवणूक झालेल्या महिलेचे नाव असून हजरत बाबा उर्फ अमजद असद खान असे फसवणूक करणारा व गुन्हा दाखल झालेल्या भोंदू बाबाचे नाव आहे