ललित मोदीच नाही तर, सुष्मिताकडे देखील महागड्या गाड्यांचं कलेक्शन

 'गोल्ड डिगर' म्हणून ट्रोल होणाऱ्या सुष्मिताकडे महागड्या गाड्यांचं कलेक्शन, गाड्यांची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये...  

Updated: Jul 19, 2022, 09:21 AM IST
ललित मोदीच नाही तर, सुष्मिताकडे देखील महागड्या गाड्यांचं कलेक्शन  title=

मुंबई : कलाविश्वात कधी कोणाचं नाव कोणासोबत जोडण्यात येईल सांगता येत नाही. सध्या अभिनेत्री सुष्मिता सेन आणि उद्योगपती  ललित मोदी यांच्या रिलेशनशिपची चर्चा आहे. सुष्मिता ललित मोदीसोबत फक्त पैशांसाठी रिलेशनशिपमध्ये आहे... असं म्हणत अभिनेत्रीला 'गोल्ड डिगर' म्हणून हिणवण्यात आलं. यावर सुष्मिताने ट्रोलर्सला उत्तर देखील दिलं. कोट्यवधी रुपयांचा मालक असलेला ललित मोदी आणि सुष्मिता रॉयल आयुष्य जगतात. 

ललिल मोदी तर कोट्यमधींचा मालक आहे, पण सुष्मिता देखील कोट्यवधींची मालक आहे. सुष्मिताकडे देखील महागड्या गाड्यांचं कलेॉक्शन आहे. डीएनएच्या रिपोर्टनुसार, सुष्मिता सेन 74 कोटी रुपयांच्या एकूण संपत्तीची मालक आहे. 

सुष्मिता वर्षाला सुमारे 9 कोटी रुपये आणि महिन्याला 60 लाख रुपये कमावते. सुष्मिता सेन आपल्या मुलींसोबत वर्सोवा, मुंबईजवळ एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहते.

सुष्मिताच्या महागड्या गाड्या
सुष्मिता सेनकडे अनेक कार आहेत. अभिनेत्रीच्या गॅरेजमध्ये 1.42 कोटी रुपयांची BMW 7 Series 730Ld, 1 कोटी रुपयांची BMW X-6, 89.90 लाख रुपयांची Audi Q7 आणि 35 लाख रुपयांची Lexus LX 470 आहे.

एका सिनेमासाठी असणार सुष्मिताचं मानधन
रिपोर्टनुसार,  सुष्मिता सेन एका सिनेमासाठी 3-4 कोटी रुपये घेते. याशिवाय अभिनेत्री ब्रँड एंडोर्समेंटसाठी 1.5 कोटी रुपये घेते. सुष्मिता सेन 2005 मध्ये सुरू झालेल्या तंत्र एंटरटेनमेंट नावाच्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीची मालक देखील आहेत. यापूर्वी ती 'बंगाली माशी की रसोई' नावाच्या रेस्टॉरंटचीही मालक होती. हे रेस्टॉरंट आता बंद झालं आहे. 

ललित मोदीकडे  देखील महागड्या गाड्यांचं कलेक्शन 
सुष्मिताचा बॉयफ्रेंड ललित मोदी जगातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक आहे. त्याच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. ललितकडे फेरारी 488 पिस्ता स्पायडर आहे, ज्याची किंमत 4.81 कोटी रुपये आहे. 

याशिवाय त्याच्याकडे बेंटले मल्सैन स्पीड, मॅक्लारेन 720S, फेरारी एफ12 बर्लिनेट, फेरारी 812 जीटीएस, बीएमडब्ल्यू 7-सीरीज 760 एलआई, अॅस्टन मार्टिन रॅपाइड, फेरारी कॅलिफोर्निया आहेत. ज्याची किंमत कोटी रुपये आहे.