Photo : 'ब्रह्मास्त्र 2'साठी निर्मात्यांनी साधला दीपिका पदुकोणशी संपर्क; साकारणार 'ही' व्यक्तिरेखा

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर 'ब्रह्मास्त्र' हा या वर्षातील मोस्ट अवेटेड चित्रपट आहे. 

Updated: Jul 18, 2022, 09:24 PM IST
Photo : 'ब्रह्मास्त्र 2'साठी निर्मात्यांनी साधला दीपिका पदुकोणशी संपर्क; साकारणार 'ही' व्यक्तिरेखा  title=

मुंबई : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर 'ब्रह्मास्त्र' हा या वर्षातील मोस्ट अवेटेड चित्रपट आहे. ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर आणि 'केसरिया' हे पहिलं गाणं रिलीज झालं आहे. 'ब्रह्मास्त्र'च्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता या चित्रपटाशी संबंधित आणखी एक बातमी समोर येत आहे की, निर्मात्यांनी 'ब्रह्मास्त्र 2' वरही काम सुरू केलं आहे.

नुकत्याच आलेल्या मीडिया रिपोर्टनुसार, 'ब्रह्मास्त्र'च्या दुसऱ्या भागात दोन नवीन पात्र दिसणार आहेत. ज्यांची नाव महादेव आणि पार्वती असेल. पार्वतीच्या भूमिकेसाठी निर्मात्यांनी बॉलिवूडची टॉप मोस्ट अभिनेत्री दीपिका पदुकोणचे नाव निवडलं आहे आणि तिच्याशी संपर्क साधला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की पहिल्या भागाच्या शेवटच्या भागात दीपिका पदुकोणची देखील जबरदस्त कॅमिओ भूमिका असेल. त्याचबरोबर महादेवच्या पात्रासाठी निर्मात्यांचा शोध सुरू आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागाची कथा शिवा आणि ईशा यांच्यावर आधारित असेल.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

थिएटरमध्ये 'ब्रह्मास्त्र'ला कसा प्रतिसाद मिळतो यावर 'ब्रह्मास्त्र 2' चे भविष्य अवलंबून आहे.  'ब्रह्मास्त्र'मध्ये रणबीर कपूरसोबत आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय सारखे दमदार कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट अयान मुखर्जीच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक आहे. ज्यामध्ये निर्मात्यांनी खूप पैसे गुंतवले आहेत.