'करीनाने हिच्याकडून शिकावं' सुहानाच्या 'त्या' कृतीवर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

Suhana Khan: शाहरूख खानची लेक सुहाना खान ही कायमच चर्चेत असते तिची अनेकदा चर्चा होताना दिसते त्यातून आता ती नुकतीच स्पॉट झाली आहे. त्यामुळे तिची विशेष चर्चा आहे. परंतु तुम्ही तिच्या ड्रेसची किंमत ऐकून चक्रावूनच जाल. 

गायत्री हसबनीस | Updated: Jul 29, 2023, 07:59 PM IST
'करीनाने हिच्याकडून शिकावं' सुहानाच्या 'त्या' कृतीवर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया title=
July 29, 2023 | sushana khan spotted at mumbai today wearing green dress netizens compare her with kareena kapoor

Suhana Khan: शाहरूखची लाडकी लेक सुहाना खान ही कायमच चर्चेत असते. आता तिचा 'द आर्चिज' हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे तिची चांगली चर्चा रंगलेली दिसते आहे. सुहाना खान ही अनेकदा स्पॉट होते. त्यामुळे तिच्या फॅशनकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिलेले असते. अनेकदा तिच्या ड्रेसिंग सेन्सची कौतुकही करण्यात येते. तिचा ड्रेसिंग सेन्स हा फार डिसेन्ट आहे असंही अनेक जण म्हणताना दिसतात. त्यामुळे तरूणाईत तिची चांगलीच चर्चा असते. जीमसाठी, कुठे फ्रेन्ड्ससोबत पार्टीसाठी त्याचबरोबर फॅमिली टाईम स्पेंड करतानाही तिच्या फॅशन स्टाईलचे कौतुक केले जाते. त्यातून सध्या सुहाना खान ही नुकतीच स्पॉट झाली आहे त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. परंतु यावेळी तुम्ही तिच्या या ड्रेसची किंमत ऐकलीत का? 

सध्या ती फारच लाईट मुडमधल्या ड्रेसमध्ये दिसते आहे. तिनं कुठलाही लुक कॅरी केला तरी तो तिला फार सुरेख दिसतो. त्यातून आय मेकअपही तिच्यावर खूप खुलून दिसतो. सध्या तिच्या या कपड्यांची चर्चा रंगली आहे. परंतु तुम्हाला जर का या ड्रेसची किंमत कळाली तर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. तिच्या या ड्रेसच्या आणि बॅगेच्या किंमतीत कदाचित तुम्ही फॉरेन ट्रीप काढाल नाहीतर कुठल्यातरी जीवनावश्यक वस्तू अनेक महिने चालवू शकाल. 

हेही वाचा - '300 रूपयात लोकं मला पाहण्यापेक्षा...' शशांक केतकर असं का म्हणाला, काय आहे त्याच्या मनात?

मुंबईत स्पॉट झाली आहे आणि यावेळी तिनं खुप सुंदर असा पिस्ता कलरचा ड्रेस घातला होता. यावेळी ती खुपच सुंदर दिसत होती. यावेळी तिनं स्केवअर नेकलाईन, पक्ड स्लीव्स आणि थाय-हाय स्लिट ड्रेस घातला होता. यावेळी ती नो-मेकअप लुकमध्ये दिसली होती. सोबतच तिनं सिंपल शुज आणि बॅग हातात घेतली होती. बॉलिवूड शादी.कॉमनुसार, तिचा हा ड्रेस फेथफुल द ब्रॅण्डचा आहे. याची किंमत ही 30 KWD इतकी आहे म्हणजेच याची किंमत ही भारतीय चलनानुसार 8,076 रूपये इतकी आहे. तिनं जी बॅग हातात घेतली होती त्याचीही किंमत सर्वाधिक होती. ही बॅग ही लुईस वुईटनची होती. ज्याची किंमत 4,700 डॉलर्स म्हणजेच 3 लाख 86 हजार 620 रूपये इतकी आहे. 

सध्या तिचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो आहे. त्यातून त्याखाली कमेंट्सही येताना दिसत आहेत. सगळ्यांनी तिचे कौतुक केले आहे तर नेहमीप्रमाणे काहींनी तिला स्टारकीड म्हणून हिटवलं आहे. तर यामध्ये एकानं फार वेगळी कमेंट केली आहे तो म्हणाला आहे की, ''करिना कपूरपेक्षा ही सुंदर आहे कारण तिला अजिबातच तिच्यासारखा एटिट्यूड नाही''

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शाहरूख खानचे सध्या अनेक चित्रपट हे लाईनअप आहेत. त्यातून त्याचा यावर्षी आलेला 'पठाण' हा चित्रपट विशेष गाजला होता. आता त्याचा 'डंकी' आणि 'जवान' चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे.